आरक्षण मिळवायचे असेल, तर सर्व मराठा समाज आणि नेत्यांनी एकसंघ होणे गरजेचे.. समरजीत सिंह घाटगे

विजय पाटील
मंगळवार, 1 जून 2021

छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज समरजीत सिंह घाटगे यांनी सांगली मध्ये मराठा समाजाची बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळवायचे असेल, तर सर्व मराठा समाज आणि नेत्यांनी एकसंघ होणे गरजेचे आहे. अशी साद त्यांनी या वेळी घातली आहे

सांगली : छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज समरजीत सिंह घाटगे Samarjit Singh Ghatge यांनी सांगली मध्ये मराठा समाजाची बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळवायचे असेल, तर सर्व मराठा समाज आणि नेत्यांनी एकसंघ होणे गरजेचे आहे. अशी साद त्यांनी या वेळी घातली आहे. राज्य सरकार आरक्षण देण्यामध्ये कमी पडले, त्यामुळे याचिका फेटाळली गेली असा आरोप ही त्यांनी यावेळी राज्य सरकार वर केला आहे. If we want to get reservation, then all Maratha community and leaders should come together

सांगली Sangali आणि कोल्हापूर Kolhapur जिल्ह्याचे मराठा समन्वयक याची सांगली मध्ये बैठक पार पडली आहे. गेल्या वेळेस मराठा समाजाने आरक्षण Maratha society reservation साठी मोर्चे काढले होते. त्यावेळेस काही तरुणांवर केसेस झाले आहेत. ते माघारी घ्यावेत. मराठा समाजात एक संघ नसल्याने आरक्षण मिळवण्यात यश येत नाही. सर्वानी एकत्र येऊन मराठा समाजाला कसे आरक्षण मिळेल हे पाहावे, असे छत्रपती शाहू महाराज यांच जनक घराण्याचे वंशज समरजीत सिंह घाटगे यांनी सांगितले आहे. 

 26 राज्यात कोरोनानंतर आता म्युकर मायकोसिसचा कहर !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्या कार्यकाळात सामाजिक आणि आर्थिक मागास असल्याच्या निकषावर मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यात आल होत. मात्र, सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारला हे आरक्षण टिकवायचे होते.  न्यायालयात Court भक्कमपणे बाजू मांडण्यात सरकारला सातत्याने अपयश आले. एकवेळ तरी सुनावणीच्या वेळी राज्य सरकारमार्फत चांगले वकीलही उपस्थित नव्हते. परिणामी सुनावणी पुढे गेली होती. If we want to get reservation then all Maratha community and leaders should come together  

हे देखील पहा 

मराठा समाज ही बाब अद्याप विसरलेला नाही. या सरकारला मराठा आरक्षणाबाबत गांभीर्य नाही किंबहुना त्यासाठी त्यांचेकडून आवश्यक ते प्रयत्नही झालेले नाहीत, असे नमूद करत मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार इतके उदासीन का?, असा सवाल घाटगे यांनी केला. या बैठकीला छत्रपती शाहू महाराज यांच जनक घराण्याचे वंशज समरजीत सिंह घाटगे,  मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि सांगली मधील भाजप BJP नेते उपस्थित होते. 

Edited By- Digambar Jadhav
 


संबंधित बातम्या

Saam TV Live