वाहन चालवताना डुलकी आल्यास तुमची गाडीच उठवेल तुम्हाला !

Sleep While Driving
Sleep While Driving

तासन् तास गाडी चालवून वाहन चालकांना अचानक डुलकी येते आणि मग घडतो अपघात. प्रवासातील एक डुलकी वाहनचालकांना जीवन-मरणाच्या प्रवासात सहज ढकलू शकते. बऱ्याचदा आपण वाहने चालवताना राज्य परिवहन विभागाने रस्त्यालगत लावलेली 'एक डुलकी एक अपघात' हि पाटी वाचलीच असेल. If you feel dozing while driving your car will wake you up

मात्र आता 'एक डुलकी एक अलर्ट' देणारी यंत्रणा राज्य परिवहन विभाग Transport Department एका नामांकित सॉफ्टवेअर Software कंपनीच्या सहकार्यातून निर्माण करत आहे. या माध्यमातून झोपेतून थेट मृत्यू स्वप्नात नेणारी डुलकी आपल्याला सावध करण्यास मदत करेल.

वाहन चालवताना चालकाला अचानक डुलकी लागते. अशा वेळी अपघाताचा धोका संभवतो. तो धोका आता या यंत्रणेच्या माध्यमातून टाळता येणार आहे. वाहन चालवताना डुलकी लागली तर चालकास सतर्क करणारी यंत्रणा System  राज्य परिवहन विभाग विकसित करणार आहे.

लांब पल्ल्याच्या प्रवासात चालक विश्रांतीची गरज असताना देखील विश्रांती घेत नाहीत. आपल्या डेस्टिनेशन ला लवकर पोहचण्यासाठी झोप येत असताना देखील तश्याच अवस्थेत वाहन चालवत राहतात. प्रसंगी स्वतःचा आणि सोबत असणाऱ्या प्रवाश्यांचा देखील जीव धोक्यात घालतात. 

हे देखील पहा -

महामार्गावर रात्रीच्या वेळी होणारे बहुतांशी अपघात हे या डुलकीतून घडलेले असतात. मात्र हि यंत्रणा लवकरच वाहनांमध्ये उपयोगात येणार असून यंत्रणेच्या विकसनाचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती सूत्रांद्वारे मिळत आहे. 

कशी असेल हि यंत्रणा ? 

चारचाकी वाहनांपासून ते अवजड वाहनांमध्ये देखील या यंत्रणेचा समावेश असेल. वाहन चालकांना झोप आल्यास इशारा देणारी हि स्वतंत्र व अद्ययावत यंत्रणा असेल. येणाऱ्या काळात हि यंत्रणा वाहनासोबतच उपलब्ध असेल मात्र सद्यस्थितीतील वाहनांसाठी ती वाहनमालकांना खरेदी करावी लागेल.

या यंत्रणेमध्ये कॅमेरा व सेन्सर असेल. वाहन चालकाच्या आसनासमोर हि यंत्रणा बसवावी लागेल. चालकाच्या डोळ्यांच्या हालचालीवर त्यातून लक्ष्य ठेवले जाईल आणि डोळ्यांची स्थिती झोपेच्या अवस्थेत आढळून आल्यास सेन्सर त्वरित धोक्याचा इशारा देईल.

By : Krushnarav Sathe 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com