तुम्ही धार्मिकस्थळी जाताय मग हे  नक्की वाचा 

तुम्ही धार्मिकस्थळी जाताय मग हे  नक्की वाचा 

नवी दिल्ली : ' धार्मिक स्थळांवर नियमांमध्येच भाविकांन दर्शन घेता येईल. या नियमांनुसार, भाविकांना मंदिरांमध्ये घंटी वाजवता येणार नाही. तसंच मंदिर, गुरुद्वारांमध्ये आत बसण्याची परवानगी नाही. तसंच सर्व धार्मिक स्थळांवर सोशल डिस्टन्सिंगचा नियम नागरिकांना कसोशीनं पाळावा लागणार आहे.
अनलॉक'च्या पहिल्या टप्प्यात येत्या ८ जून रोजी शॉपिंग मॉल, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि धार्मिक स्थळे, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याची नागरिकांना परवानगी मिळणार आहे. यानुसार, अनेक धार्मिक स्थळ भाविकांसाठी खुली करण्याची तयारीही ठिकठिकाणी सुरू आहे. करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर काही दिशानिर्देश नागरिकांनी पाळणं आवश्यक ठरणार आहे.

 गुरुद्वारामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होईल याची काळजी घेण्यात येईल. परंतु, प्रसाद बंद होणार नाही. हा प्रसाद लोकांची रोगप्रतिकारकक्षमता वाढवणारा असेल. लोकांना गुरुद्वारामध्ये बसण्याची परवानगी नसेल. लोकांना चप्पल आणि बूट गुरुद्वारा परिसरात आणता येणार नाहीत. चप्पल-बूट तुमच्या गाडीतच ठेवावेत किंवा आणखी कुठे ठेवण्याची सोय करावी. डोक्यावर घेण्यासाठी रुमाल किंवा कपडा आपल्या घरातूनच घेऊन यावा. दिल्लीच्या बंगला साहिब गुरुद्वारामध्ये टेम्परेचर मोजण्याचं यंत्रही लावण्यात आलं आहे. तसंच सॅनिटाईझ मशीनही लावण्यात आलंय.


सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं यासाठी अनेक ठिकाणी भाविकांना मंदिरात उभं राहण्यासाठी गोल आखले गेले आहेत
धार्मिक स्थळांना वारंवार सॅनिटाईझ करणं गरजेचं असेल. यासाठी अनेक ठिकाणी सॅनेटाईज टनेल उभारण्यात आलेत.तसंच कोणत्याही भाविकांना मंदिरात प्रसाद वाटता येणार नाहीमंदिरात घंटा वाजवता येणार नाही. अनेक मंदिरात अगोदरपासून घंटा कपड्यांनी बांधून ठेवण्यात आल्या आहेत.धार्मिक स्थळांवर लहान मूलं, गर्भवती महिला आणि ६५ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना येण्याची बंदी राहील.मंदिरमध्ये कुणालाही मूर्तीसमोर कोणत्याही वस्तू अर्पण करता येणार नाहीत

WebTittle :If you go to a religious place then definitely read this

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com