तुम्ही CCTV लावले असतील तर ही बातमी पाहाच! तुमचाही CCTV कॅमेरा हॅक होऊ शकतो...

साम टीव्ही
सोमवार, 15 मार्च 2021

तुमच्या सीसीटीव्ही फुटेजवर कुणाची नजर?
सीसीटीव्हीवर हॅकर्सचा डोळा
भारतातही सीसीटीव्ही हॅकर्सचा सुळसुळाट

 

 

तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये लावलेला सीसीटीव्ही सुरक्षित आहे असा तुमचा समज होता. पण आता तुमच्याच सीसीटीव्हीच्या माध्यमातून तुमच्यावरच पाळत ठेवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

आजकाल घरात, ऑफिसमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणीही सीसीटीव्ही लावले जातात. गुन्ह्यांमध्ये सीसीटीव्ही आरोपी शोधण्यासाठी भक्कम पुरावा मानला जातो. पण आता सायबर गुन्हेगारांची सीसीटीव्हीवरही नजर पडू लागलीय. सायबर गुन्हेगार सीसीटीव्ही हॅक करु लागलेत. अमेरिकेत सायबर गुन्हेगारांनी जवळपास दीड लाख सीसीटीव्ही कॅमेरे हॅक केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. त्यामुळं सीसीटीव्ही इन्स्टॉल करताना काही खबरदारी घेण्याची गरज निर्माण झालीय. सीसीटीव्हीसाठी चिनी हार्डवेअर वापरु नका. सीसीटीव्हीसाठी युजरनेम पासवर्ड ठेवावा. सीसीटीव्ही वापरताना डेटा इन्क्रिप्टेड तंत्रज्ञानाचा वापर करावा असा सल्ला तज्ज्ञ देतात. 

 सीसीटीव्ही तुमचा परिसर अधिक सुरक्षित करतो. पण याच सीसीटीव्हीचा कोणी दुरुपयोगही करु शकतो. तुमचा सीसीटीव्ही हॅक करुन तुमच्यावर पाळत तर ठेवली जात नाही ना याची एकदा खात्री करुन घ्या.
 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live