बौद्धिक विकास करायचा असेल तर करा गणिताचा अभ्यास  

वृत्तसंस्था
बुधवार, 9 जून 2021

संशोधनानुसार, किशोरवयात गणितापासून दूर राहिल्यास किंवा दुर्लक्ष केल्यास  विद्यार्थ्यांच्या विचार करण्याच्या आणि समजण्याच्या क्षमतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

मुलांच्या बौद्धिक विकासासाठी Intellectual development गणितासारख्या Mathematics विषयाची प्रचंड आवश्यकता आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या Oxford University संशोधनानुसार,  किशोरवयात गणितापासून दूर राहिल्यास किंवा दुर्लक्ष केल्यास  विद्यार्थ्यांच्या विचार करण्याच्या आणि समजण्याच्या क्षमतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. 14 ते 18 वर्षे वयोगटातील 133 विद्यार्थ्यांवरील केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. ब्रिटनमध्ये 16 वर्षांच्या मुलांना गणित विषय सोडण्याचे स्वातंत्र्य आहे, तर इतर देशांमध्ये असे नाही. याचा थेट परिणाम विद्यार्थ्याच्या मेंदूच्या विकासावर होतो, असे संशोधकआणि म्हटले आहे.  (If you want brilliant intellect, study mathematics) 

हत्तींचा कळप निघाला जगसफारीला - पहा व्हिडओ

गणिताचा  मेंदूशी आहे अगदी जवळचा संबंध 
किशोरवयात जे विद्यार्थी गणिताचा अभ्यास करत नाहीत किंवा या विषयांपासून दूर राहतात अशा विद्यार्थ्यांच्या मेंदूच्या एका  विशिष्ट भागावर त्याचा परिणाम होत असतो. त्यांच्या विचार करण्याचा आणि समजून घेण्याच्या क्षमतेस जबाबदार असलेल्या मेंदूच्या अशा भागात विशिष्ट  प्रकारचे  (गामा-अमीनोब्यूट्रिक अॅसिड) रसायनांची निर्मिती होत असते.  त्यामुळे जे विद्यार्थी गणिताचा अभ्यास करत नव्हते त्यांच्या मेदूत या प्रकारच्या रासायनांची निर्मिती  प्रक्रिया कमी झाल्याचे दिसून आले आहे.  

संशोधनादरम्यान, विद्यार्थ्यांचे दोन गट केले गेले. पहिल्या गटात गणिताच्या विषयाचे विद्यार्थी होते. तर दुसऱ्या गटात असे विद्यार्थी होते ज्यांनी गणिताचा विषय घेतला नव्हता. सुमारे 19 महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या मेंदूची तपासणी केली गेली. मात्र 19 महिन्यांनंतरही गणिताच्या विषयापासून स्वत: ला दूर ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेंदूत विचार करण्यास व समजून घेण्याच्या क्षमतेस जबाबदार असणाऱ्या रसेनाची निर्मिती कमी प्रमाणात होत असल्याचे आढळून आले. मात्र त्याच वेळी, गणितातील विद्यार्थ्यांमध्ये हे रसायन  पुरेश्या प्रमाणात होते.

शारीरिक विकासावर गणिताचा प्रभाव
संशोधक रौ कोहेन म्हणतात की,विद्यार्थ्यांवर गणिताचा शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे   परिणाम  होत असतो. किशोरवस्था हे एक विशेष वय आहे कारण या वयात मेंदूच्या विकासासह, विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता देखील विकसित होत असते.  परंतु या काळात बरेच विद्यार्थी गणितापासून स्वत: ला दूर ठेवतात आणि ज्यामुळे त्यांच्या मेंदूचा विकास कमी होऊ लागतो. 

Edited By- Anuradha Dhawade  
 


संबंधित बातम्या

Saam TV Live