अवैध वीटभट्टीच्या वायू प्रदूषणाने पुसदच्या नागरिकांना श्वसनाचा त्रास

Brick Klin Pollution
Brick Klin Pollution

यवतमाळ: जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाचा Corona प्रकोप वाढत आहे. अशातच तेथील नागरिकांना श्वसनाचा त्रास Respiratory distress होण्यास सुरुवात झाली आहे. कारण चंद्रपूर Chandrapur स्थित प्रदूषण विकास महामंडळाच्या सर्व नियमांना बगल देत यवतमाळ Yavatmal जिल्ह्यातील पुसद Pusad येथे अनेक वीटभट्टी Brick kiln कारखाने  सुरूच आहेत. Illegal brick kiln air pollution causes respiratory distress to Pusad citizens 

वास्तविक वीटभट्टी कारखान्यांना ३१ मार्च पर्यंतचा तात्पुरत्या स्वरूपाचा परवाना देण्यात आला होता. मात्र या परवान्याची मुदत संपूनही या वीटभट्टया तहसिल प्रशासनाच्या नाकावर टिचून नियमबाह्य पद्धतीने सुरूच आहेत. याबाबत स्थानिक तहसिल प्रशासन मात्र मुंग गिळून गप्प आहे.

पुसद येथे कार्ला रोडवरील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंतामणी देवस्थानासमोर वीट भट्टी आहेत. शिवाय या भागात एक खाजगी शाळा पण आहे. वीटभट्टीतून  निघणाऱ्या दगडी कोळश्याच्या धुरामुळे हजारो नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे. कोरोना या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर दररोज प्रातःकाळी ४ वाजल्यापासून कार्लारोडवर सर्व वयोगटातील शेकडो नागरिक  वाकिंग, रनिंग, योगासने, सायकलिंग करण्याकरिता  या परिसरात नियमित ये-जा करीत असतात. Illegal brick kiln air pollution causes respiratory distress to Pusad citizens

सकाळचे शुद्ध ऑक्सीजन मिळण्या ऐवजी या नागरिकांना केमिकल Chemical युक्त वायू श्वसन करावा लागतो. यामुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्या  परिसरातील नागरिकांच्या प्रकृतीस धोका निर्माण होत आहे. या परिसरात अश्या अनेक वीटभट्टी असून यावर प्रशासनाने योग्य कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com