आयएमएचे (IMA) उपाध्यक्ष म्हणतात....नरेंद्र मोदीच कोरोनाचे  'सुपर स्प्रेडर' !

Narendra Modi
Narendra Modi

नवी दिल्ली : इंडियन मेडिकल असोसिएशनचे Indian Medical Association डॉ. नवजोत दहिया Navjyot Dahiya यांनी असा दावा केला की,  मोदी हे भारतातील कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेसाठी जबाबदार आहेत. त्यांनी मोदींना या भयंकर लाटेसाठी "सुपर स्प्रेडर" Super Spreader असे देखील संबोधले आहे. IMA vice president says Modi is a super spreader of coronavirus in India

पंतप्रधानांनी PM आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत आणि उलट त्याऐवजी मतदानसाठी Elections सभा घेऊन काढून कुंभमेळ्यास Kumbhmela देखील परवानगी दिली होती.

''वैद्यकीय Mediacal क्षेत्रातील लोक इतर जनतेला कोव्हिडचे नियम समजावून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Narendra Modi मात्र हे नियम हवेत उधळून लावत आहेत. आणि त्यांना असे करत असताना जराही त्यात गैर काही वाटत नाही. त्यांनी मोठ्या राजकीय मोर्चांना संबोधित करण्यास अजिबात संकोच केला नाही,'' असे दहिया यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले

आरोग्य संकटाची तीव्रता असूनही, हरिद्वारमधील कुंभमेळ्यासारख्या निवडणुका रॅली आणि धार्मिक संमेलने सर्व काही चालू आहेत. या घातक विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मोदींच्या नेतृत्त्वात असलेल्या केंद्र सरकारला याचे गांभीर्य आहे कि नाही यावर आता प्रश्न उपस्थित होत आहेत, असेही दहिया म्हणाले आहेत 

''जानेवारी २०२० मध्ये कोरोनव्हायरसचा पहिला रुग्ण जेव्हा भारतात सापडला तेव्हा पंतप्रधानांनी संक्रमणास सामोरे जाण्याची व्यवस्था केली नाही. असे करण्याऐवजी अमेरिकेचे America तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trumph यांच्या स्वागतासाठी गुजरातमधील Gujrat एक लाखाहून अधिक लोकांचे मेळावे आयोजित केले,'' असाही आरोप दहिया यांनी केला. IMA vice president says Modi is a super spreader of coronavirus in India

“कोविडची दुसरी लाट शिगेला पोहोचली असताना, संपूर्ण आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत आहे. कारण पंतप्रधानांनी वर्षभर ते मजबूत करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही,” असा दहियांचा आरोप आहे.

खासगी वैद्यकीय क्षेत्र आणि राज्य सरकार यांच्या अपयशाचा बडगा उगारल्याबद्दल पंतप्रधानांवर टीका करताना डॉ. दहिया म्हणतात.. “शेतकरी कायद्यांच्या विरोधात Farmers Protest आंदोलन करण्याच्या मुद्द्यावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीही कृती केली नाही. जबाबदार पध्दतीने आणि त्यांच्या समस्या सोडविल्याशिवाय मोठ्या संख्येने शेतकर्‍यांच्या उपस्थितीला परवानगी दिली. मोठ्या प्रमाणात दिल्लीत गर्दी होऊ दिली. त्यामुळे कोविड पसरण्याचा गंभीर धोका निर्माण झाला. IMA vice president says Modi is a super spreader of coronavirus in India

कोविड -१९ मधील अनेक रुग्णांच्या मृत्यूचे कारण वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता आहे. ऑक्सिजन प्लांट्स Oxygen Plants बसविण्याचे अनेक प्रकल्प अद्याप मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे प्रलंबित आहेत, परंतु मोदी सरकारने अशा महत्वाच्या गरजेकडे अद्यापही लक्ष दिलेले नाही, असाही दहिया यांचा आरोप आहे.

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com