बीड शिवसेना महिला आघाडीकडून फडणवीसांच्या प्रतिमेला बांगड्याचा आहेर

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

बीड : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आंदोलनावेळी आझाद मैदानातील भाषणात सरकारवर टीका करत असताना महिलांबाबत अपशब्द काढून महिलांचा अपमान केला. याच्या निषेधार्थ बीडच्या शिवसेना महिला आघाडीने फडणवीस यांच्या प्रतिमेला बांगड्याचा आहेर केला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांचा निषेध करण्यात आला. यावेळी महिला पदाधिकार्‍यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसमोर साडी-चोळी आणि बांगड्यांचा आहेर ठेवून घोषणाबाजी केली. 

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आणि महिलांबाबत अपशब्द काढणार्‍या फडणवीसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगिता चव्हाण, शेख फरजाना, शांता राऊत, शामल पवार, सारिका काळे, भगिरथ जाधव, संगिता वाघमारे, सारिका डोंगरे, सविता अलझेंडे, रेखा वाघमारे, संजिवनी जावळे, शारदा डुलगुज, नंदिनी परदेशी यांची उपस्थिती होती.

WEB TITLE-  The image of Fadnavis from the Beed Shiv Sena Women's Front is a ban

संबंधित बातम्या

Saam TV Live