राज्यात कांदा प्रश्न पेटला, निर्यातबंदी उठवण्यासाठी शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन

संपूर्ण नाशकात कांद्यांचा प्रश्न पेटलाय. कांद्यावरील निर्यातबंदी तातडीनं हटवावी आणि कांद्याला हमीभावाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलेत. लासलगाव, मनमाड, उमराणे या सर्वच ठिकाणी शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडलेत. येत्या 2 दिवसांत कांद्यावरील निर्यातबंदी न हटल्यास गुरुवारी रेलरोको आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. महाराष्ट्र राज्य कांदा ऊत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनीं हे आंदोलन केलंय... कांद्याची निर्यातबंदीचे ट्विट करून सहा दिवस उलटून गेल्यानंतर ही अधिसूचना न निघाल्याने कांद्याच्या बाजार भावात घसरण झालीय. शनिवारच्या तुलनेत आज सोमवारी 332 रुपयांची तर गुरुवारच्या तुलनेत 650 रुपयांची घसरण झाल्याने शेतकरी संतप्त झालेत.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com