Aamir Khan's Best Movie: बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी केलेले आमिर खानचे Top 5 चित्रपट

आमिरने २००८मधील 'गजनी' चित्रपटापासून 100 कोटींचा क्लबमध्ये प्रवेश केला.
Aamir Khan's Best Movie
Aamir Khan's Best Moviesaam tv
Published on

Top 5 Movie Of Aamir Khan: आमिर खानचा 14 मार्च 2023 रोजी 58 वा वाढदिवस आहे. आमिरने २००८मधील 'गजनी' चित्रपटापासून 100 कोटींचा क्लबमध्ये प्रवेश केला. तर 2016 मधील दंगल या जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्टने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. आज त्याच्या वाढदिवशी जाणून घेऊया आमिरचे सर्वाधिक कमाई करणाऱ्या पाच चित्रपट.

Aamir Khan's Best Movie Dangal
Aamir Khan's Best Movie DangalSaam TV

नितेश तिवारी दिग्दर्शित, 2016मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये आमिर खानने कुस्तीपटू महावीर सिंग फोगटची भूमिका साकारली होती. जगभरातील 2070 कोटींहून अधिक कलेक्शनसह, दंगल हा जागतिक स्तरावर सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला होता. बॉलिवूड हंगामानुसार या चित्रपटाचे भारतातील कलेक्शन फक्त 387.38 कोटी रुपये आहे.

Aamir Khan's Best Movie PK
Aamir Khan's Best Movie PKSaam TV

राजकुमार हिरानी दिग्दर्शित 2014 साली सायन्स-फिक्शन कॉमेडी-ड्रामा चित्रपट 'पीके'मध्ये आमिर खान भारतीय समाजातील धर्माच्या आधारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा एलियन दाखविण्यात आला होता. या चित्रपटाने भारतात 340.8 कोटी रुपयांची कमाई केली आणि देशांतर्गत कलेक्शनमध्ये आमिर खानचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.

Aamir Khan's Best Movie Dhoom 3
Aamir Khan's Best Movie Dhoom 3Saam TV

चोर साहिर आणि समर यांच्या दुहेरी भूमिकेत आमिर खान धूम 3 मध्ये दिसला होता. हा यशराज फिल्म्सच्या अॅक्शन थ्रिलर धूम फ्रँचायझीमधील तिसरा भाग आहे. बॉलिवूड हंगामानुसार, विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित चित्रपटाने भारतात 284.27 कोटी रुपयांची कमाई केली. आमिरचा हा सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट आहे.

Aamir Khan's Best Movie 3 Idiots
Aamir Khan's Best Movie 3 IdiotsSaam TV

राजकुमार हिरानी दिग्दर्शित, 2009 च्या चित्रपटात आमिर खान शास्त्रज्ञ फुनसुख वांगडू आणि नकली रनछोडदास श्यामलदास चंचड उर्फ ​​रॅंचोची भूमिका साकारली होती. 202.95 कोटी रुपयांच्या देशांतर्गत कलेक्शन करणारा 3 इडियट्स हा चित्रपट आमिरच्या कारकिर्दीत चौथ्या स्थानावर आहे.

Aamir Khan's Best Movie Thugs of Hindostan
Aamir Khan's Best Movie Thugs of HindostanSaam TV

ठग्स ऑफ हिंदोस्तानला समीक्षक आणि प्रेक्षकांनी पसंती दिली असली तरी, बॉलीवूड हंगामानुसार 2018 च्या या अॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर चित्रपटाने 151.30 कोटी रुपयांची कमाई केली. विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित, ठग्स ऑफ हिंदोस्तान हा आमिर खानचा सर्वाधिक कमाई करणारा पाचवा चित्रपट आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com