हवामान खात्याच्या अंदाजाने शेतकरीराजा जुंपला मशागतीस

भूषण अहिरे
रविवार, 9 मे 2021

जुन महिन्यामध्ये खरीप हंगामासाठी यावर्षी पाऊस सरासरी पेक्षा जास्त राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकरी राजाने पूर्व पावसाळी शेतीकामे उरकण्यास सुरुवात केली आहे. रखरखत्या उन्हात शेतीची मशागत करण्यात शेतकरी राजा जुंपला असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.

धुळे : जुन महिन्यामध्ये खरीप हंगामासाठी यावर्षी पाऊस Rain सरासरी पेक्षा जास्त राहणार असल्याचा अंदाज हवामान Weather Forecaste Department खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकरी Farmer राजाने पूर्व पावसाळी शेतीकामे उरकण्यास सुरुवात केली आहे.  रखरखत्या उन्हात शेतीची Farming मशागत करण्यात शेतकरी राजा जुंपला असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. IMD Forecasts Early Monsoon This Year

गेल्यावर्षी हवामान खात्याने चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. मात्र खरीप हंगामानंतर पावसाने उघडीप दिल्याने खरीपापाठोपाठ रब्बीचा हंगामही वाया गेला होता.

एकीकडे कोरोना; दुसरीकडे पावसाने उडवले डोक्यावरचे छप्पर

त्यामुळे काही अंशी निराशा शेतकऱ्याच्या पदरात पडली, जेमतेम आलेल्या पावसावर शेतीही नीट पिकली नाही आणि पिकालाही भाव न मिळाल्याने लागवडीचा खर्चही निघाला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

हे देखिल पहा- 

यावेळेस मात्र चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असल्याने हवालदील झालेल्या शेतकऱ्याच्या आशा पल्लवित झाल्या असून शेतकरी वर्ग कंबर कसुन शेतीच्या मशागतीला लागला आहे. तालुक्याचे तापमान 40 ते 42 अंशावर पोहचले असताना शेतकरी या उन्हामध्ये मशागत करत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. IMD Forecasts Early Monsoon This Year

Edited By - Krushna Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live