पावसाचा अंदाज ठरला खोटा ... 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

मुंबई: बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे सांताक्रूझ येथे गुरुवार सकाळी ८.३० पर्यंत ६९.४ मिलीमीटर आणि कुलाबा येथे १६.६ मिलीमीटर पाऊस पडला. त्यानंतर गुरुवारसाठी रेड अलर्ट मिळाल्याने मुंबईकरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र सकाळी ८.३० ते सायं. ५.३० पर्यंत कुलाबा येथे ०.८ मिलीमीटर आणि सांताक्रूझ येथे केवळ ०.१ मिलीमीटर पाऊस पडला. सकाळीच उन्हे पडायला सुरुवात झाल्याने हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याची टर उडवली गेली. पाऊस आहे कुठे, असा प्रश्न विचारण्यात आला. शाळांना सुट्टी जाहीर केल्याने अनेक विद्यार्थी घरीच बसले.

मुंबई: बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे सांताक्रूझ येथे गुरुवार सकाळी ८.३० पर्यंत ६९.४ मिलीमीटर आणि कुलाबा येथे १६.६ मिलीमीटर पाऊस पडला. त्यानंतर गुरुवारसाठी रेड अलर्ट मिळाल्याने मुंबईकरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र सकाळी ८.३० ते सायं. ५.३० पर्यंत कुलाबा येथे ०.८ मिलीमीटर आणि सांताक्रूझ येथे केवळ ०.१ मिलीमीटर पाऊस पडला. सकाळीच उन्हे पडायला सुरुवात झाल्याने हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याची टर उडवली गेली. पाऊस आहे कुठे, असा प्रश्न विचारण्यात आला. शाळांना सुट्टी जाहीर केल्याने अनेक विद्यार्थी घरीच बसले. त्यामुळे चुकीच्या इशाऱ्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान का करण्यात आले, असा प्रश्नही उपस्थित झाला. बुधवारी रात्री कडाडणाऱ्या विजांना पाहता मुंबईकरांमध्ये गुरुवारच्या पावसाबद्दल धास्ती निर्माण झाली होती. मात्र हवामान विभागाचे सगळे इशारे खोटे ठरवत पावसानेच मुंबईकरांना दिलासा दिला. मुंबईमध्ये सांताक्रूझ आणि कुलाबा येथे केवळ शिडकावा झाल्याची नोंद झाली. मात्र विद्यार्थ्यांनी आणि नोकरदार वर्गाने सुट्टीचा आनंद घेतला.सकाळीच उन्हे पडायला सुरुवात झाल्याने हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याची टर उडवली गेली. पाऊस आहे कुठे, असा प्रश्न विचारण्यात आला. शाळांना सुट्टी जाहीर केल्याने अनेक विद्यार्थी घरीच बसले. त्यामुळे चुकीच्या इशाऱ्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान का करण्यात आले, असा प्रश्नही उपस्थित झाला.
प्रादेशिक हवामान विभागाने गुरुवारी दुपारी रेड अलर्ट मागे घेतला. हा इशारा बदलून गुरुवारी तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार पाऊस पडेल असे प्रादेशिक हवामान विभागाने सांगितले. शुक्रवारसाठीही हाच इशारा देण्यात आला आहे. सर्वसाधारणपणे सप्टेंबरमध्ये गडगडाट होतो. पावसाचे कमी झालेले प्रमाण, सूर्यकिरणे आणि आर्द्रतेची उपलब्धता यामुळे संध्याकाळच्या सुमारास ढगांचा गडगडाट होण्याची शक्यता असते. हवेच्या वरच्या थरामध्ये सातत्याने होणाऱ्या बदलामुळे ही परिस्थिती निर्माण होते. मुंबईने यंदाच्या पावसाळ्यात चार वेळा तडाखा अनुभवला आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला अलर्ट देऊनही योग्य पावले उचलली न गेल्याने मुंबईकरांची दैना उडाली. हवामान विभागानेही अलर्ट दिल्यावर योग्य पावले का उचलली जात नाहीत, असा प्रश्न त्यावेळी उपस्थित केला गेला होता. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी दिलेला इशारा गांभीर्याने घेण्यात आला. मात्र पावसाने अजिबात उपस्थिती न लावल्याने हवामान विभागावर जोरदार टीका झाली. यासंदर्भात हवामान विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही.

Web Title : imds red alert proves false
 


संबंधित बातम्या

Saam TV Live