आजपासून होणार बँकींग क्षेत्रात महत्वाचे बदल 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

मुंबई : बँकांना बाह्य मानकावर आधारित व्याजदर बंधनकारक असेल. दिवाळीच्या खरेदीला चालना देण्याच्यादृष्टीने ऑक्‍टोबरपासून बाह्य मानकावर आधारित (एक्‍स्टर्नल बेंचमार्क) कर्जदर लागू करण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने सर्व बॅंकांना दिले आहेत.

1 ऑक्‍टोबरपासून ही प्रणाली बँकांसाठी बंधनकारक केल्याने गृह, वाहन, वैयक्तिक तसेच उद्योजकांसाठीचा कर्जाचा दर अर्धा ते पाऊण टक्‍क्‍याने कमी होण्याचा अंदाज आहे.

पतधोरणातील व्याजदर कपातीचा ग्राहकांना लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बॅंकांना रेपो दराशी सुसंगत व्याजदर निश्‍चित करावा लागेल. सध्या बँकांकडून "मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट"नुसार (एमसीएलआर) कर्जाचा दर ठरवला जातो, मात्र ही पद्धत रेपो दर कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहचवण्यात फायदेशीर ठरत नाही. यामुळे गृहकर्जदर प्रणाली पारदर्शक होण्याची शक्‍यता आहे. 

इंधनबिलावरील कॅशबॅक बंद 

तेल वितरक कंपन्यांच्या सूचनेनुसार बँकांकडून क्रेडीट कार्डद्वारे इंधन खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा कॅशबॅक आजपासून बंद होणार आहे. क्रेडीट कार्डद्वारे इंधनचा बिल अदा करणाऱ्या ग्राहकांना एक ऑक्‍टोबरपासून 0.75 टक्के कॅशबॅक मिळणार नाही, असे "एसबीआय"ने ग्राहकांना संदेश पाठवले आहेत. मात्र इतर डिजिटल पर्यायांद्वारे इंधन खरेदी करणाऱ्याच्या सवलती कायम राहतील, असे बॅंकेने स्पष्ट केले आहे.

Web Title: important changes in banking sector
 
संबंधित बातम्या

Saam TV Live