जगाला मिळाला एन-95 मास्कच्या पुनर्वापराचा नवा मंत्र

साम टीव्ही
शुक्रवार, 15 मे 2020

कोरोनाच्या संकटात एन-95 मास्कबाबत दिलासादायक बातमी
जगाला मिळाला एन-95 मास्कच्या पुनर्वापराचा नवा मंत्र
एन-95 मास्कच्या नावाखाली होणारी कोट्यवधींची लूट थांबणार

कोरोनाच्या संकटात मास्कचा वापर प्रचंड वाढलाय. त्यातच N-95 मास्कचा काळाबाजारही जोरात सुरूय. मात्र, N-95 मास्कचा शोध लावणाऱ्या संशोधकानं, केलेल्या दाव्यामुळे हा काळाबाजार थांबणारेय.

कोरोनाचं संकट आल्यापासून जगभरात मास्कचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. मात्र त्यातही एन-95 मास्कच्या सुरक्षिततेवर जगभरात शिक्कामोर्तब झालंय. त्यामुळे कोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्स आणि इतरही आरोग्यसेवक मुख्यत: एन-95 मास्क वापरण्यावर भर देतात. कारण 

कसा बनतो एन-95 मास्क?
तैवानमधील भातशेती करणाऱ्या गरीब कुटुंबातील पीटर तिसाईंनी एन-95 मास्कचा शोध लावला. एन-95 मास्क बनवताना सूक्ष्म धाग्यांना स्थिर विद्युत भरणा म्हणजे इलेक्ट्रॉनिक चार्जिंगद्वारे प्रभावित केलं जातं. जागतिक मानकांचं काटेकोर पालन केल्यामुळे सूक्ष्म विषाणूंना रोखण्याची मास्कची क्षमता 10 पटीने वाढते.
म्हणूनच कोरोनाच्या संकटात एन-95 मास्कचा वापर प्रचंड वाढला. मात्र त्याच्या पुनर्वापराबाबत संभ्रम असल्याने त्याचा गैरफायदाही घेतला जाऊ लागलाय. एन-95 मास्कची चढ्या दराने विक्री करून कोट्यवधींची लूट केली जातेय. मात्र आता एन-95 मास्कचा पुनर्वापर करता येणारेय. कारण, एन-95 मास्कचा शोध लावणाऱ्या पीटर तिसाईंनीच हा दावा केलाय. 

कसा होणार मास्कचा पुनर्वापर?
वापरलेला एन-95 मास्क 70 डिग्री सेल्सिअसमध्ये 1 तासासाठी ठेवल्यास त्याच्यावरील विषाणू 100 टक्के नष्ट होतात. त्याचसोबत उष्ण वाफ आणि अतिनील किरणांच्या माऱ्यानेही वापरलेल्या मास्कवरील विषाण्ंचा खात्मा होतो असा दावा करण्यात आलाय.
एन-95 मास्कचा पुनर्वापर सहज शक्य असल्याचा दावा खुद्द पीटर तिसाईंनीच केल्याने मोठा दिलासा मिळालाय. त्यामुळे एन-95 मास्कच्या काळाबाजाराला आळा बसेलच, पण, एन-95 मास्कच्या पुनर्वापराचा महत्त्वाचा मूलमंत्र जगाला मिळालाय.


संबंधित बातम्या

Saam TV Live