प्राप्तिकर विभागाचा मोर्चा कांदा व्यापार्‍यांकडे

प्राप्तिकर विभागाचा मोर्चा कांदा व्यापार्‍यांकडे

चार दिवसांत कांदा दरात पुन्हा 825 रुपयांनी आलेली तेजी लक्षात घेऊन प्राप्तिकर विभागाने आपला मोर्चा कांदा व्यापार्‍यांकडे वळविला आहे. जिल्ह्यातील 11 ठिकाणी आयकर खात्याने छापे टाकल्याचे वृत्त असून, त्यात लासलगाव येथील चार व्यापार्‍यांचा समावेश आहे.

किरकोळ दरात कांद्याने शंभर रुपये किलोचा दर ओलांडताच आयकर विभागाच्या पथकाने सोमवारी लासलगाव येथील चार मोठ्या कांदा व्यापार्‍यांवर छापे टाकून त्यांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी केली. तसेच घर, गोडावूनची पाहणी केली. दिवसभर चाललेल्या या कार्यवाहीत नेमके काय निष्पन्न झाले, त्याची स्पष्टता केली गेली नाही. या प्रकाराने कांदा व्यापार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात सटाणा, येवला आदी ठिकाणच्या व्यापार्‍यांवर छापे पडल्याचे वृत्त असून, त्याविषयी अधिकृत माहिती  मुदत दिली. आता शिवसेना राष्ट्रवादीला पाठिंबा देणार का? या प्रश्नाने राज्याच्या राजकीय वर्तुळात फेर धरला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पुरेसे  संख्याबळ नसल्याने भाजपने सत्ता स्थापनेस नकार दिला. त्यापाठोपाठ राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले. मात्र राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत शिवसेना बहुमताची जादूई फिगर गाठू न शकल्याने शिवसेनेची कोंडी झाली. राज्यपालांच्या निमंत्रणानुसार अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजभवनावर रवाना झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापण्याचा दावा करण्यासाठी चोवीस तासांची मुदत देण्यात येणार असल्याचे समजते. मुंबई आणि नवी दिल्लीत आज वेगवान आणि नाट्यपूर्ण घडामोडी झाल्या. काँग्रेसने एक पत्र दिले. मात्र त्यामध्ये पाठिंब्याचा एक शब्दही नव्हता. त्यामुळे शिवसेनेला बहुमताचा दावा करता आला नाही.

काँग्रेस आमदारांची सरकार बनवण्यासाठी पाठिंबा द्यावा, अशी भूमिका होती. तथापि, दिवसभरात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे बैठका होऊनही पाठिंब्याबाबत काही निर्णय झाला नाही.

पाठिंबा द्यायच्या वेळी दिवसभर सोनिया गांधींच्या निवासस्थानी काँग्रेस नेत्यांच्या बैठकीचा सिलसिला सुरू राहिला. सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी दिलेली वेळ संपत आली तरी काँग्रेसने पाठिंब्यासाठी कसलेही पत्र दिले नाही. जे पत्र दिले, त्यामध्ये आपली शरद पवार यांच्याशी चर्चा झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसशी पुढील चर्चा सुरू असल्याचे गुळमुळीत पत्र काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिले. मात्र पाठिंब्याचा कोणताही उल्लेख नसल्यामुळे शिवसेना राज्यपालांसमोर बहुमताचा दावा करू शकली नाही. या सगळ्या राजकीय गदारोळात महाराष्ट्राची वाटचाल राजकीय अनिश्चितीकडे व राष्ट्रपती राजवटीकडे  सुरू झाली आहे.
पवारांची सोनिया यांच्याशी चर्चा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण विरोधात बसणार, तसा जनादेश आहे, अशी भूमिका मांडली असली तरी राष्ट्रवादीतील नेते आणि शिवसेनेचे नेते परस्परांशी चर्चेत होते. यातूनच शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसमध्ये मतभिन्नता होती. अन्य राज्यात निवडणुका असल्यामुळे तेथील निवडणुकांवर परिणाम होणार असल्याचे कारण देत काँग्रेसने सावध भूमिका घेतली.

webTittle : Income tax front to onion traders


 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com