कोरोनामुळे तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या उत्पन्नात तब्बल 60% घट 

विश्वभूषण लिमये
सोमवार, 26 एप्रिल 2021

शासनाने कोरोना फैलाव रोखण्यासाठी  मंदिर देवस्थाने बंद केली आहेत. त्यामुळे महामारीत कोरोनाचा फटका यावेळेस तुळजाभवानी संस्थानच्या उत्पन्नाला बसलेला आहे. गतवर्षीच्या तुलनेत मंदिर संस्थेच्या उत्पन्नात तब्बल 60% घट झालेली दिसून आली आहे.

उस्मानाबाद: कोरोना  Corona महामारी सर्वत्र पसरत चालली आहे. शासनाने कोरोना फैलाव रोखण्यासाठी  मंदिर देवस्थाने बंद केली आहेत. त्यामुळे महामारीत कोरोनाचा फटका यावेळेस तुळजाभवानी Tulajabhavani संस्थानच्या उत्पन्नाला बसलेला आहे. गतवर्षीच्या तुलनेत मंदिर संस्थेच्या उत्पन्नात तब्बल 60% घट झालेली दिसून आली आहे. Income of Tulja Bhavani Mandir Sansthan decreased by 60 percent due to corona

गतवर्षी मंदिर संस्थानच्या उत्पन्नात 26 कोटींची भर पडली होती, तर मागच्या आर्थिक वर्षात मंदिर संस्थानला केवळ 10 कोटी दान मिळाले. गेल्या वर्षभरापासून जागतिक महामारी कोरोनाने हाहाकार माजवला आहे.

मागील वर्षाचा सुरुवातीचा काळ सोडला तर वर्षभर लॉकडाऊन Lockdown, त्यानंतर संचारबंदी Curfew आणि निर्बंधांच्या Restrictions सावटाखाली प्रचंड तणावाचा सामना करावा लागला. यामध्ये वर्षभर देशातील धार्मिकस्थळे सुद्धा बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान यावर्ष काही दिवस मंदिरे खुली करण्यात आली होती. मात्र नंतर आता शासनामार्फत मोठ्या प्रमाणात निर्बंध लादण्यात आली आहेत.

दर्शनाला भाविक न येऊ शकल्याने या सर्वांचा फटका तुळजाभवानी मंदिराच्या उत्पन्नाला Income बसला असून मंदिर संस्थानच्या उत्पन्नात फार मोठी घट झाली आहे.

Edited by-Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live