भारतीयांकडून "डिजिटल कंटेन्ट'ला प्रचंड मागणी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 17 मे 2019

मुंबई - माहिती तंत्रज्ञानाच्या लाटेवर स्वार झालेल्या भारतीयांकडून "डिजिटल कंटेन्ट'ला प्रचंड मागणी आहे. व्हिडीओ कंटेन्ट, ब्रॅंडिंग, स्पोर्टस्‌ याबरोबरच ऑनलाईन बातम्या वाचणाऱ्यांची संख्या कोट्यवधींच्या पुढे गेली आहे. त्यात नवी दिल्ली, मुंबई आणि बेंगळूरु या महानगरांमध्ये डिजिटल कंटेन्टचा मोठा वाचक असून पुढील काळात डिजिटल जाहिरांतीच्या क्षेत्रात मोठी वाढ होईल, असा विश्‍वास डिजिटल कंटेन्ट वाचकांपर्यंत पोहचवणाऱ्या "तबूला' या ऑनलाईन मंचाचे वरिष्ठ उपाध्यक्ष रॅन बॅक यांनी व्यक्त केला आहे. 

भारतात डिजिटल कंटेन्ट मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तबूला मंचाला दर महिन्याला एक कोटी 20 लाख पेजव्ह्यूज मिळतात. त्या खालोखाल बेंगळूरुमधून 87 लाख आणि मुंबईतून 73 लाख पेजव्ह्यूज मिळतात, असे बक यांनी सांगितले. ग्राहकांना नेमके काय हवे आहे. त्यांच्या आवडीनिवडीविषयी संशोधन करून तबूला त्यांच्या भागीदार कंपन्यांना माहिती पुरवते. त्यानुसार त्यांना व्यवसायात चांगले परिणाम मिळतात. तबूलाने कॉर्पोरेटस्‌पासून माध्यमांमधील 20 हजार भागीदारांसोबत करार केले आहेत. भारतातील आघाडीच्या वृत्तसंस्था तबूलाच्या भागीदार आहेत. गुगलच्या तोडीच्या सेवा देणाऱ्या तबूलाची सेवा भागीदारांसाठी 30 टक्के स्वस्त आहे. वाचकाला योग्यवेळी त्याच्या आवडीचा कंटेन्ट उपलब्ध करण्याचे सर्वांसमोर आव्हान आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी "तबूला'ने मुंबईत नवे विपणन केंद्र सुरू केले आहे. त्याशिवाय गुडगाव येथे नवे कार्यालय सुरू केले असल्याचे बक यांनी सांगितले. तबूला लवकरच स्वयंचलित मोटारी आणि रेफ्रीजरेटर्ससाठी संबंधित भागीदारांचा डिजिटल कंटेन्ट उपलब्ध करेल, अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: Increase in demand for digital content

संबंधित बातम्या

Saam TV Live