धक्कादायक! नंदुरबारमध्ये कोरोना काळात कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ

दिनू गावित
रविवार, 30 मे 2021

सध्या नंदुरबारमधला कुपोषणाचा आकडा हा दहा हजारांच्या घरात असला तरी प्रत्यक्ष परिस्थीती याहुन भयावह आहे.

आदिवासी बहुल भाग असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar District) सातपुडा अतिदुर्गम भाग नेहमीच कुपोषणासाठी राज्यात कुप्रसिद्ध राहीला आहे. मात्र कोरोना (Coronavirus) काळात कुपोषणाची स्थिती आणखी गंभीर होतानाचे चित्र सध्या तरी दिसुन येत आहे. नंदुरबारमध्ये एप्रिल २०२० च्या तुलनेत तब्बल २,५०८ ने कुपोषीतांचा आकडा वाढला असुन नंदुरबारमध्ये एप्रिल अखेरीस ९,४२१ बालके कुपोषीत आहेत. त्यातील ८,९२१ बालक ही मॅम श्रेणीतील तर ९०८ बालक ही सॅम म्हणजे तीव्र स्वरुपातल्या कुपोषीत श्रेणीतील आहे. मागच्या एप्रिलमध्ये कुपोषितांचा हाच आकडा ६,९२१ इतका होता. त्यामुळेच वर्षभरात कुपोषणाचे प्रमाण वाढल्याचे  चित्र आहे. असे असले तरी दुसरीकडे मात्र तीव्र कुपोषीत बालकांच्या (Malnourished Children) पोषण आणि उपचारासाठी तयार करण्यात आलेल्या पोषण पुर्नवसन केंद्राकडे आदिवासी पालक मात्र पाठ फिरवतांनाच चित्र आहे. कोरोणाच्या भीतीमुळे पालक आपल्या बालकांना याठिकाणी घेवुनच येत नसल्याने जिल्ह्यातील महत्वाची पोषण पुर्नसवसन केंद्र चक्क ओस पडली आहे. यातलचे अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयातील पोषण पुर्नवस केंद्र.  

 मोदी सरकारने सात वर्षात देशाला देशोधडीला लावले : भंडारा शहर काँग्रेसचा आरोप

अक्कलकुवा प्रमाणेच दुर्गम भागातील, मोलगी, धडगाव, तळोदा येथील पोषण पुर्नवसन केंद्राची अवस्था काही वेगळी नाही, याठिकाणचे पोषण पुर्नवसन केंद्रात देखील कुपोषीत बालकांची उपचारासाठी प्रतिक्षा कायम आहे. त्यामुळे यातील अनेक केंद्रात जिल्हा प्रशासनाने लसीकरण कॅम्प सुरु केले आहे. यात अक्कलकुवा आणि धडगाव पोषण पुर्नवसन केंद्राचा समावेश आहे. गेल्या वर्षी कोरोणाची पहिली लाट असुनही पोषण पुर्नवसन केंद्रात कुपोषीत बालकांची गर्दी देखील कायम होती हे आकडेवारीवरुनच स्पष्ट होत आहे.(Increase in the number of malnourished children in Nandurbar during the Corona period)

ठिकाण  एप्रिल 2020 एप्रिल  2021
नंदुरबार डीएच 180 03
मोलगी एनआरसी 177 00
धडगाव एनआरसी 159 00
तळोदा एनआरसी 68 00
अक्कलकुवा सीटीसी 99 00
एकूण  683 03

आकडेवारी पाहता सध्या जिल्हा सामान्य रुग्णलायासारख्या अत्यंत महत्वाच्या ठिकाणी फक्त ०३ कुपोषीत बालक दाखल आहे. त्यामुळेच पावसाळ्यात कुपोषणाची स्थिती भयावह होण्याची भिती स्वतः डॉक्टर्स व्यक्त करत आहे. खर तर अंगणवाडी मार्फत तीव्र कुपोषीत मुलांना एनआरसीमध्ये दाखल करण्याची जबाबदारीच अंगणवाडी सेविकांवर निर्धारीत करण्यात आली आहे. मात्र कोरोणा काळात आजुबाजुला कोरोणा विलगीकरण कक्ष असल्याने आदिवासी बहुल भागातील पालक याठिकाणी बालकांसह येण्यास घाबरत असल्याने सध्यातरी गाव पातळीवर 748 व्हीसीटीसीच्या माध्यमातुन १,१४४ बालकांवर घरीच उपचार चालु असल्याचे महिला बालकल्याण विभागाचे म्हणने आहे. एखाद्या बालकाची तीव्र कुपोषणाकडे वाटचाल झाल्यास त्याला तात्काळ दाखल करण्याच्या सुचनाही देण्यात आल्याचे महिला बालविकास अधिकारी सांगत आहे.

काय सांगणार आज मुख्यमंत्री; लाॅकडाऊन वाढ की निर्बंधातून सवलत?

सध्या नंदुरबारमधला कुपोषणाचा आकडा हा दहा हजारांच्या घरात असला तरी प्रत्यक्ष परिस्थीती याहुन भयावह आहे. दुर्गम अतिदुर्गम भागात अशा कुपोषीत बालकांना वेळीच उचारासाठी दाखल नाही केल तर पावसाळ्यात बालमृत्युचा आकडा वाढुन कुपोषणाच्या दाहकतेचे खापर पुन्हा एकदा आरोग्य प्रशासनाच्या माथी फोडले जाण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे कोरोणाच्या कचाट्यात सापडेलेल्या प्रशासनाने आता तरी डोळे उघडुन तात्काळ कुपोषीत बालकांच्या स्वास्थ्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

Edited By : Pravin Dhamale

हे देखील पाहा 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live