नंदुरबार, सातपुडा अतिदुर्गम भागात कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ 

nandurbar
nandurbar

नंदुरबार : राज्यातील कोरोना नंदुरबार जिल्ह्यात महामारीच्या संकटात राज्यातील सातपुडा अतिदुर्गम भागातील कुपोषणाकडे प्रशासन  दुर्लक्ष  करत असल्याचे समोर आले आहे.  याचा परिणाम म्हणजे गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी नंदुरबारमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढले आहे. तर  दुसरीकडे कोरोनाच्या भीतीपोटी आता आदिवासी पालकही आपल्या मुलांना पोषण पुर्नवसन केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यास घाबरत असल्याची भयावह स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच पावसाळ्यात कुपोषणाची स्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  (Increase in the number of malnourished children in remote areas of Nandurbar, Satpuda) 

आदिवासी बहुल भाग असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा अतिदुर्गम भाग नेहमीच कुपोषणासाठी राज्यात कुप्रसिद्ध राहीला आहे. मात्र कोरोना काळात कुपोषणाची स्थिती अधिकच गंभीर होताना दिसुन येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात एप्रिल 2020 च्या तुलनेत तब्बल 2508  ने कुपोषीतांचा आकडा वाढला असुन जिल्ह्यात एप्रिल अखेरीस 9421   कुपोषीत बालकांची नोंद करण्यात आहे. त्यातील 8921 बालके ही मॅम श्रेणीतील (माध्यम)  तर 908 बालके ही सॅम  (तीव्र) स्वरुपातील कुपोषीत श्रेणीतील आहे.  एप्रिल 2020 मध्ये कुपोषींताचा हाच आकडा 6921 इतका होता.  त्यामुळेच वर्षभरात कुपोषणाचे प्रमाण वाढल्याच चित्र आहे. 

असे असले तरी दुसरीकडे मात्र तीव्र कुपोषीत बालकांच्या पोषण आणि उपचारासाठी तयार करण्यात आलेल्या पोषण पुर्नवसन केंद्राकडे आदिवासी पालक मात्र पाठ फिरवत आहेत. कोरोनाच्या  भीतीमुळे पालक आपल्या बालकांना याठिकाणी घेऊनच  येत नसल्याने जिल्ह्यातील महत्वाची पोषण पुर्नवसन केंद्र चक्क ओस पडली आहे. यातलचे हे आहे अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयातील पोषण पुर्नवसन केंद्र याठिकाणी शुन्य बालक दाखल झाले आहेत. कुपोषण पुनर्वसन केंद्रांवर उपचारासाठी नियुक्त असलेल्या परिचारिकांनी याबाबत माहिती दिली आहे. 

अक्कलकुवा प्रमाणेच दुर्गम भागातील, मोलगी, धडगाव, तळोदा येथील पोषण पुर्नवसन केंद्राची अवस्था काही वेगळी नाही, याठिकाणचे पोषण पुर्नवसन केंद्रात देखील कुपोषीत बालकांची उपचारासाठी प्रतिक्षा कायमच आहे. त्यामुळे यातील अनेक केंद्रात जिल्हा प्रशासनाने लसीकरण कॅम्प सुरु केले आहे. यात अक्कलकुवा आणि धडगाव पोषण पुर्नवसन केंद्राचा समावेश आहे. गेल्या वर्षी कोरोणाची पहिली लाट असुनही पोषण पुर्नवसन केंद्रात कुपोषीत बालकांची गर्दी देखील कायम होती हे आकडेवारीवरुनच स्पष्ट होत आहे.
 एस एल चव्हाण - नर्स - पोषण पुर्नवसन केंद्र - अक्कलकुवा

खर तर अंगणवाडी मार्फत तीव्र कुपोषीत मुलांना एनआरसी मध्ये दाखल करण्याची जबाबदारीच अंगणवाडीसेविकांवर निर्धारीत करण्यात आली आहे. मात्र कोरोना  काळात आजुबाजुला कोरोना विलगीकरण कक्ष असल्याने आदिवासी बहुल भागातील पालक याठिकाणी बालकांसह येण्यास घाबरत असल्याने सध्यातरी गाव पातळीवर 748 व्हीसीटीसीच्या माध्यमातुन  1144 बालकांवर घरीच उपचार चालु असल्याचे महिला बालकल्याण विभागाचे म्हणणे  आहे. तर  एखाद्या बालकाची तीव्र कुपोषणाकडे वाटचाल झाल्यास त्याला तात्काळ दाखल करण्याच्या सुचनाही देण्यात आल्याचे महिला
बालविकास अधिकारी सांगत आहे.

डॉ बाळकृष्ण बागुल - वैद्यकीय अधिक्षक - मोलगी ग्रामीण रुग्णालय

सध्या नंदुरबारमधला कुपोषणाचा आकडा हा दहा हजारांच्या घरात असला तरी प्रत्यक्ष परिस्थीती याहुन भयावह आहे. दुर्गम अतिदुर्गम भागात अशा कुपोषीत बालकांना वेळीच उचारासाठी दाखल नाही केल तर पावसाळ्यात बालमृत्युचा आकडा वाढुन कुपोषणाच्या दाहकतेचे खापर पुन्हा एकदा आरोग्य प्रशासनाच्या माथी फोडले जाण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे कोरोनाच्या कचाट्यात  सापडेलेल्या प्रशासनाने आता तरी डोळे उघडुन तात्काळ कुपोषीत बालकांच्या स्वास्थ्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

कृष्णा राठोड - महिला बालविकास अधिकारी - नंदुरबार
 

                          एप्रिल 2020                   एप्रिल 2021

नंदुरबार डीएच            180                             03
मोलगी एनआरसी         177                            00
धडगाव एनआरसी        159                            00
तळोदा एनआरसी         68                             00
अक्कलकुवा सीटीसी      99                             00

एकुण                         683                            03

ही आकडेवारी पाहता सध्या जिल्हा सामान्य रुग्णलायासारख्या अत्यंत महत्वाच्या ठिकाणी फक्त 03  कुपोषीत बालक दाखल आहे. त्यामुळेच पावसाळ्यात कुपोषणाची स्थिती भयावह होण्याची भिती स्वत डॉक्टर्स व्यक्त करत आहे.

Edited By- Anuradha Dhawade 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com