मागील २४ तासात भारतात नवीन ४,१२,२६२ कोरोना बाधित रुग्णांची नोंद

coronavirus
coronavirus

नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने Union Ministry of Health and Family Welfare दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी भारतात नवीन ४,१२,२६२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर गेल्या २४ तासात ३,९८०  रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. देशाची संख्या आता २.१ कोटीच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रात ९२० सर्वाधिक रुग्णांच्या मृत्यची नोंद करण्यात आली. आणि  त्यानंतर उत्तर प्रदेशात 353 मृत्यू नोंदविले. Increasing Covid 19 Cases and Death update in India 

३० एप्रिल रोजी एकाच दिवसात ४ लाखांवर केसेस नोंदविणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. सर्वाधिक प्रकरणे नोंदविणाऱ्या पहिल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्र ५७,६४० कर्नाटक ५०,११२ , केरळमध्ये ४१,९५३ , उत्तर प्रदेशात ३१,१११ आणि तामिळनाडूमध्ये २३,३१० प्रकरणे नोंदली गेली आहेत. 

हे देखील पहा -

या पाच राज्यांतून ४९.५२% नवीन प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत, तर नवीन प्रकरणांपैकी १३.९८% फक्त महाराष्ट्र मधेच आहेत.

भारतात आतापर्यंत ३५,६६,३९८ सक्रिय प्रकरणे आहेत. आणि आतापर्यंत २,३०,१६९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. एमएचएफडब्ल्यूच्या  MoHFW म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत बरे झाल्यावर एकूण ३,२९,११३ लोकांना सुट्टी देण्यात आली आहे. Increasing Covid 19 Cases and Death update in India 

आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, देशात एकूण १६,२५,१३,३३९ जणांना लसी देण्यात आली. यामध्ये गेल्या २४ तासांत १९,५५,७३३ जणांना लसी देण्यात आल्या आहेत.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या Indian Council of Medical Research नुसार बुधवारी ४ मे पर्यंत २९,६७,७५,२०९ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असून,  यापैकी १९,२३,१३१ नमुने बुधवारी घेण्यात आले.

बुधवारी, कोविडच्या दुसर्‍या लाटेखाली कर्नाटकात ५०,००० च्या तुलनेत नवीन केसेस सापडल्या असून त्यामध्ये बेंगलुरूमध्ये २३,१०६ जणांचा समावेश आहे. तसेच केरळमध्ये गेल्या २४ तासांत ४१,९५३ प्रकरणे नोंदली गेली.

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com