भारताने चारली ऑस्ट्रेलियाला धूळ; ऑस्ट्रेलियाची झुंज अपयशी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 डिसेंबर 2018

अॅडलेड : स्थानिक वेळेनुसार दुपारचे पावणे चार वाजले असताना अश्विनने हेझलवुडला बाद केले आणि भारतीय खेळाडू अ‍ॅडलेड ओव्हल मैदानावर नाचू लागले. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 31 धावांनी जिंकून भारतीय संघाने झकास सुरुवात केली.

विजयाकरता गरजेच्या सहा ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद करताना गोलंदाजांना साडेचार तास कष्ट करावे लागले. एका शतकासह दोनही डावात अफलातून फलंदाजी करणार्‍या चेतेश्वर पुजाराला सामनावीर घोषित केले गेले. ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर आल्यावर मालिकेतील पहिला कसोटी सामना भारतीय संघाने जिंकण्याची किमया पहिल्यांदाच घडली. भारताने ऑस्ट्रेलियामध्ये जिंकलेला हा केवळ सहावा सामना आहे. 

सामना जिंकायच्या जिद्दीने दोन्ही संघ सोमवारी मैदानात उतरले. भारतीय संघाच्या विजयाच्या आशा व्यावहारिक असताना ऑस्ट्रेलियाच्या आशा भाबड्या होत्या. शॉन मार्शने पाचव्या दिवशी खेळ चालू झाल्यावर सुंदर फलंदाजी केली. बाकी ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे बचावाचे तंत्र साशंक असताना शॉन मार्शचे भक्कम होते. ट्रॅव्हीस हेडला अंगभेदी बाउन्सर टाकून गडबडवले. उपहाराअगोदर जसप्रीत बुमराने 75 षटके जुन्या चेंडूवर स्थिरावलेल्या शॉन मार्शला बाद करताना टाकलेला चेंडू सुंदर होता. 60 धावा करताना मार्शने चांगली खिंड लढवली. 

Web Title: India beat Australia by 31 runs at Adelaide

संबंधित बातम्या

Saam TV Live