VIDEO | कामगार संघटनांची भारत बंदची हाक

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 8 जानेवारी 2020

 आज भारत बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये प्रमुख कामगार संघटनांबरोबरच सहा बँक संघटना सहभागी होणार आहेत. यामुळे बँकिंग सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. 

केंद्र सरकारच्या कामगार धोरणाला विरोध करण्यासाठी आणि कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आज भारत बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये प्रमुख कामगार संघटनांबरोबरच सहा बँक संघटना सहभागी होणार आहेत. यामुळे बँकिंग सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. भारत बंदमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी, सहकारी बँक, ग्रामीण बँक आणि एलआयसीचे कर्मचारी सहभागी होणारेत..

सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनेने आज, बुधवारी पुकारलेल्या देशव्यापी संपामुळे बँकांच्या दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दहा कर्मचारी संघटनांनी संपाची हाक दिली आहे. यामुळे पैसे भरणे, पैसे काढणे, चेक वटवणे आदी दैनंदिन व्यवहाराला अडचण येऊ शकते. खासगी बँकांचे कामकाज मात्र नेहमीप्रमाणे सुरू असेल.

कामगारविरोधी धोरणांमुळे १२ विमानतळे खासगीकरणाच्या हेतूने विकण्यात आली आहेत. एअर इंडियाचीही १०० टक्के विक्री ठरलेली आहे. बीपीसीएल विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे. बीएसएनएल-एमटीएनएल विलिनीकरणाची घोषणा झाली आहे. ९३,६०० दूरसंचार कामगारांना व्हीआरएसच्या बाहेर काढण्यात आले आहे. रेल्वेचे खासगीकरण, ४९ संरक्षण उत्पादनांचे कॉर्पोरेटायझेशन आणि बँकांचे विलीनीकरण करण्याच्या विरोधातही या कामगार संघटना आहेत, असे कामगार संघटनांनी निवेदनात नमूद केले आहे.

मुंबईतील लोकल, बेस्ट, रिक्षा, टॅक्सी, एसटी सेवा सुरळीत सुरू राहणार आहेत. 'मुंबईतील रिक्षा-टॅक्सी नेहमीप्रमाणे सुरूच राहतील', असे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष ए. एल क्वाड्रोस यांनी सांगितले. बेस्ट उपक्रमातील कामगारांसह रिक्षा-टॅक्सी सेवेतील चालक-मालकांनी संपास पाठिंबा दिला असला तरी, सेवांवर परिणाम होणार नाही. एसटी संघटनांनी आंदोलनात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला.

WebTittle :: India calls for closure of trade unions

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live