भारतात कोरोनामुळे 1147 जणांचा मृत्यू...सध्या कोरोनाबाधितांचा आकडा इतका...

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 1 मे 2020
  • भारतात कोरोनामुळे 1147 जणांचा मृत्यू
  • देशात कोरोनाबाधितांची संख्या 35 हजारांवर
  • 8889 जणांवर यशस्वी उपचार
  • कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 35 हजारांवर गेलाय. तर आतापर्यंत 1147 जणांचा मृत्यू झालाय. 25 हजार 7 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून 8889 लोकांना उपचारानंतर घरी पाठण्यात आलय. आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिलीय. दरम्यान महाराष्ट्रात सर्वाधिक 10 हजार 498 रुग्ण आढळले असून मृतांची संख्या 459 वर पोहोचली आहे. शेजारच्या गुजरातमध्येही आतापर्यंत 214 लोक दगावले आहेत ..तर मध्य प्रदेशात 137 जणांचा मृत्यू झालाय. दिल्लीत 59, राजस्थानात 58, उत्तर प्रदेशात 39 तर पश्चिम बंगालमध्ये 33 जणांचा मृत्यू झालाय.

राज्यात गुरुवारी कोरोना रुग्णांच्या संख्येने दहा हजारांचा आकडा गाठलाय. राज्यात गेल्या 24 तासांत 583 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे राज्यातल्या कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 10 हजार 498 वर पोहोचलाय. तर  दिवसभरात 27 जणांचा मृत्यू झाला असून 180 जणांना  डिस्चार्ज देण्यात आलाय. आतापर्यंत राज्यात 1 हजार 773 रुग्णं बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. याशिवाय राज्यात आतापर्यंत 1 लाख 45 हजार 798 चाचण्या करण्यात आल्यात. दरम्यान, मुंबई आणि पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी डोकेदुखी ठरत असल्याचं दिवसेंदिवस अधोरेखित होत चाललंय. राज्यात कोरोनाच्या पहिल्या साडेचार हजार रुग्णांची नोंद होण्यासाठी ४२ दिवस लागले. मात्र, त्यानंतर पुढील पाच हजार रुग्णांचा टप्पा राज्याने अवघ्या आठ दिवसांत ओलांडला. त्यामुळे पन्नास दिवसांमध्ये राज्य 10 हजार रुग्णांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले. 


संबंधित बातम्या

Saam TV Live