इंटरनेट वापरण्यावर भारत दुसऱ्या क्रमांकावर

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

 

 

बंगळुरू: भारताच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या एक तृतीयांश असून यात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत, असे निरीक्षण या अहवालात नोंदवले आहे. घरात उपलब्ध असणाऱ्या गॅजेट्सच्या साह्याने ही मुले इंटरनेट हाताळतात.दरमहा इंटरनेटवर सक्रिय असणाऱ्यांची भारतातील संख्या ४५.१० कोटी असून यातील ३८.५० कोटी यूजरचे वय हे १२ वर्षांपेक्षा अधिक आहे. गंभीर बाब म्हणजे पाच ते १२ वर्षे या वयोगटातील ३.८५ कोटी मुलांकडून इंटरनेटचा वापर केला जातो. 
इंटरनेटचा वापर करणाऱ्या भारतीयांची संख्या ४५.१० कोटींवर पोहोचली आहे. नेटकऱ्यांच्या या सूचीमध्ये चीन पहिल्या क्रमांकावर असून भारताने दुसरे स्थान मिळवले आहे. इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. ही आकडेवारी मार्च २०१९ अखेरची आहे.

Web Title : india is second in internet usage


संबंधित बातम्या

Saam TV Live