भारत विरूध्द चीन | व्यापारी महासंघाने टाकला 'या' वस्तूंवर बहिष्कार

भारत विरूध्द चीन | व्यापारी महासंघाने टाकला 'या' वस्तूंवर बहिष्कार

वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कैट) चीनमध्ये तयार होणाऱ्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गलवाण खोऱ्यात सैनिकांवर करण्यात आलेल्या हल्ल्यावर देशभरातील व्यापाऱ्यांनी टीका केली. संधी मिळेल तेव्हा चीन भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न करतो. चीनची ही भूमिका भारताच्या विरूद्ध असल्याचं सांगत व्यापारी महासंघानं चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची भूमिका महासंघाने घेतली आहे. ‘भारतीय सामान-हमारा अभिमान’ या अभियानातंर्गत मंगळवारी बहिष्कार टाकण्यात येणाऱ्या ५०० मेड इन चायना वस्तूंची यादी जारी केली आहे.

महासंघानं बहिष्कार टाकलेल्या वस्तूंमध्ये दैनंदिन कामात वापरल्या जाणाऱ्या वस्तू, घड्याळ, ज्वेलरी, स्टेशनरी साहित्य, कागद, घरात वापरल्या जाणाऱ्या वस्तू, फर्निचर, लाईटिंग, आरोग्यासंबंधी वापरल्या जाणाऱ्या वस्तू, पॅकिंगसाठी वापरलं जाणारं साहित्य, ऑटो पाटर्स,खेळणी, फर्निशिंग फॅब्रिक, कापड (टेक्सटाइल), बांधकामासाठी लागणार साहित्य, पायताण (फुटवेअर), गारमेंटस, स्वयंपाक घरात वापरात येणारं सामान, हॅण्ड बॅग, कॉस्मेटिक, भेट म्हणून दिल्या जाणाऱ्या वस्तू, ईलेक्ट्रीकल्स व ईलेक्ट्रॉनिक्, खाद्यान्न, दिवाळी व होळी या सणाच्या काळात विकल्या जाणाऱ्या वस्तू, चश्मे अशा ५०० प्रकारच्या श्रेणीतील ३००० वस्तूंचा समावेश आहे.

महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया या निर्णयाविषयी बोलताना म्हणाले, “सध्या चीनमधून भारतातील वार्षिक आयात ५.२५ लाख कोटी रुपयांची आहे. महासंघाने पहिल्या टप्प्यात ३००० वस्तूंची निवड केली आहे. या वस्तू भारतातही तयार होतात, मात्र स्वस्त मिळत असल्यानं आतापर्यंत चीनमधून आयात केल्या जातात. या वस्तू तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं तंत्रज्ञानाची गरज नाही. त्यामुळे चिनी वस्तूंऐवजी भारतात तयार करण्यात आलेल्या वस्तूंचा उपयोग सहजपणे केला जाऊ शकतो. त्यातून भारताचं चीनवरील अवलंबून राहणार मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते,” असं भारतीया म्हणाले.

प्रत्यक्ष ताबारेषेवर तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात लष्करी स्तरावर चर्चा सुरू असतानाच, सोमवारी रात्री पूर्व लडाखमधील गलवाण खोऱ्यात अचानक उसळलेल्या अभूतपूर्व संघर्षांमध्ये भारताचे २० जवान शहीद झाले असून, चीनचे ४३ सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे. यात भारताच्या कर्नल पदावरील लष्करी अधिकाऱ्याचा समावेश आहे. यामुळे उभय देशांदरम्यान तणाव वाढला आहे.

WebTittle :India vs China | Federation of Traders boycotts 'these' items

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com