कोरोनाच्या संकटात भारत-चीन सीमेवर तणाव, भारतीय सीमेजवळ चिनी लष्कराच्या कुरापती

साम टीव्ही
सोमवार, 11 मे 2020
  • कोरोनाच्या संकटात भारत-चीन सीमेवर तणाव
  • भारतीय सीमेजवळ चिनी लष्कराच्या कुरापती
  • चीनचा सुंभ जळला तरी पीळ जाईना

आता बातमी भारत-चीनमधल्या तणावाची... संपूर्ण जग कोरोनाशी लढत असताना तिकडे चीन-भारत सीमेवर तणाव निर्माण झालाय.नेमकं काय घडलंय सिक्कीममध्ये.

संपूर्ण जगात कोरोनाविरोधात महायुद्ध सुरू असताना तिकडे चीनच्या कुरापती थांबायचं नाव घेईनात. गेल्या काही दिवसांत चिनी जवान आणि भारतीय जवान आमने-सामने आलेयत. उत्तर सिक्कीमच्या सीमावर्ती भागात हा तणाव निर्माण झालाय. भारतीय सैन्याने चीनला सडेतोड उत्तर दिलंय. या झटापटीत दोन्ही बाजूचे काही सैनिक किरकोळ जखमीही झालेयत.

भारत-चीन सीमेवर झालेला तणाव लष्कराच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी तूर्तास मिटवला असला तरी, इतर वेळीही लडाख, अरुणाचल प्रदेशातील सीमेवर चीनमुळे तणाव निर्माण होत असतो, मात्र आता चीन आणि भारतासह संपूर्ण जगासमोर कोरोनाचं संकट उभं असताना, आणि संपूर्ण जग चीनकडे संशयाने बघत असताना, चीनच्या या उचापती नजरेआड करता येणार नाहीत.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live