9 चिन्यांना धूळ चारणार एक भारतीय जवान! कसा? तुम्हीच वाचा

साम टीव्ही
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020
  • एक हिंदुस्तानी..९ चिनी
  • भारतीय सैनिक जगात भारी
  • 9 चिन्यांना धूळ चारणार एक भारतीय जवान

 भारताला सीमेवर धूळ चारण्यासाठी चीन जंगजंग पछाडतोय. त्यासाठी चीनने दसपट ताकद लावलीय. पण भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास युद्धभूमीवर भारताशी गाठ पडल्यास चीन चारीमुंड्या चीत होणार हे नक्की.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनने आपल्या सैन्याची मोठ्या प्रमाणावर जमवाजमव सुरू केलीय. चिनी बळाची भारतीय फौजेशी तुलना केल्यास एका भारतीय सैनिकांमागे 9 चिनी सैनिक सीमेवर तैनात आहेत. पण सध्याच्या युद्धभूमीचा विचार केल्यास एक भारतीय सैनिक 9 चिनी सैनिकांना भारी पडेल. 

कारण भारतीय सैन्याच्या छावण्या लडाखमधल्या उंच टेकड्यांवर उभारल्या आहेत. तर चिनी सैन्याचे तळ हजारो फूट खाली सखल भागात आहेत. सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास चिनी सैन्य जर तळमजल्यावर असल्याचं गृहित धरलं तर भारतीय सैन्य एखाद्या इमारतीच्या 30 व्या मजल्यावर असेल. त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या भारतीय सैन्याची हीच उंचावरची पोझिशन भारताला प्रत्यक्ष लढाईत सरशी साधून देईल. 

चिनी सैन्याला अशा डोंगराळ आणि खडकाळ भागात लढण्याचा अनुभव भारतीय सैन्याच्या तुलनेत अगदीच कमी आहे. त्यामुळे चिनी सैन्याने जरी सीमेवरची कुमक वाढवली तरीही अशा डोंगराळ युद्धभूमीवर भारतीय सैन्याला भिडणं चिन्यांसाठी अधिक जिकरीचं असेल हे नक्की.


संबंधित बातम्या

Saam TV Live