Breaking ज्येष्ठ ख्याल गायक पं. राजन मिश्रा यांचे निधन

Pt. Rajan Mishra
Pt. Rajan Mishra

नवी दिल्ली : बनारस घराण्याचे ज्येष्ठ शास्रीय गायक पं. राजन मिश्रा यांचे दिल्लीत निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शास्रीय संगीतातील गुरूतुल्य व्यक्तिमत्व हरपलं आहे. मृत्यूसमयी ते ७० वर्षांचे होते. Indian Classical Singer Pt. Rajan Mishra Passes Away

ख्याल गायकीबद्दल प्रसिद्ध असलेले पंडित राजन मिश्रा यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना दिल्लीच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राजन आणि साजन मिश्रा ही गायकांची जोडी एकत्रच आपली कला सादर करत असत. या दोन्ही बंधूंना साऱ्या जगभर प्रसिद्धी मिळाली होती. संगिताचे सात सूर 'सारेगमपधनी' हे पशू पक्षांच्या आवाजातून बनले आहेत, असे ते सांगत. 

पंडित राजन मिश्रा यांना २००७ मध्ये भारत सरकारच्या वतीने दिला जाणारा पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. १९७८ मध्ये श्रीलंकेत त्यांनी आपला पहिला कार्यक्रम सादर केला होता. त्यानंतर संपूर्ण जगभरात त्यांनी आपली कला सादर केली. 

Edited By - Amit Golwalkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com