भारतीय कंपनी पाठवणार जगातील 127 देशांना औषध, अमेरिकन कंपनीशी करार

साम टीव्ही
बुधवार, 13 मे 2020

भा कंपनी पाठवणार जगातील 127 देशांना औषध
कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या औषधाचा जगभर पुरवठा
अमेरिकन कंपनीशी करार, भारतीय कंपनी पुरवठादार

कोरोनावर अजूनपर्यंत लस मिळाली नसली तरी काही औषधं उपचारासाठी प्रभावी ठरतायंत. विशेष म्हणजे एका भारतीय कंपनीच्या पुढाकारानं या औषधांचा जगभर पुरवठा होणार आहे. कोणती आहे ही भारतीय कंपनी वाचा...

कोरोनावर रामबाण उपाय ठरेल, अशी लस अद्याप मिळालेली नाही. तरीही कोरोनावर काही औषधं प्रभावी ठरतायंत. यापैकीच एक औषध म्हणजे रेमेडेसिवीर. जगभरात या औषधाच्या साहाय्यानं कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. आता याच औषधाचा पुरवठा एक भारतीय कंपनी अवघ्या जगाला करणार आहे. देशातील आघाडीची फार्मास्युटिकल कंपनी जुबिलंट लाइफ सायन्स १२७ देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या उपचारात प्रभावी ठरणारं रेमेडेसिवीर औषध विकणार आहे. यासाठी जुबिलंट लाईफ सायन्सनं गिलियड या अमेरिकन कंपनीशी करार केलाय. हा करार भारत आणि इतर १२७ देशांसाठी आहे. 

अमेरिकन कंपनी गिलियडने रेमडेसिवीर बनविण्यासाठी 3 भारतीय कंपन्यांशी करार केला आहे. या तीन कंपन्यांमध्ये ज्युबिलंट लाइफ सायन्स, हेटरो आणि सिप्ला ही आहेत. ज्युबिलंट लाइफ सायन्स या देशांमध्ये या औषधांची विक्री करेल.

यापूर्वीही हायड्रोक्सिक्लोरिक्वीन हे मलेरिया उपचारासंबंधी औषध कोरोनावर प्रभावी ठरलं होतं आणि या औषधाचा पुरवाठा साऱ्या जगाला भारतानं केला होता. अगदी महासत्ता म्हणवून घेणाऱ्या अमेरिकेलाही भारताकडे हायड्रो-क्सि-क्लोरिक्वीनची मागणी करावी लागली होती. आता रेमेडेसिवीर या कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या औषधाचा भारत जगाला पुरवठा करणार आहे. ग्लोबल समस्येवरचा हा लोकल पुरवठा नक्कीच प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live