सिंगापुरात अडकलेले 52 विद्यार्थी सुखरुप मायदेशी परतले!

प्रमिल क्षेत्रे
शुक्रवार, 20 मार्च 2020

सिंगापूर अधिका-यांकडून मदत मिळत नसल्याचा आरोप या विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता. साम टीव्हीनेदेखील या विद्यार्थ्यांची बातमी लावून धरली होती.

मुंबई - सिंगापूर विमानतळावर अडकलेल्या ५२ भारतीय विद्यार्थ्यांची अखेर सुटका झाली आहे. फिलिपाईन्स आणि मलेशिया इथून भारतात येण्यासाठी हे विद्यार्थी निघाले होते. मात्र, काल सकाळपासून हे विद्यार्थी सिंगापूर विमानतळावर अडकले होते. या विद्यार्थ्यांना मुंबईत सुखरुप आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः सिंगापूरमधल्या भारतीय दूतावासाशी संपर्क साधला होता. त्यानंतर अखेर या विद्यार्थ्यांना बोर्डिंग पास देण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून, भारतात आलेल्या विद्यार्थ्यांना पुढील 14 दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवलं जाणार आहे.

 

सिंगापूर अधिका-यांकडून मदत मिळत नसल्याचा आरोप या विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता. साम टीव्हीनेदेखील या विद्यार्थ्यांची बातमी लावून धरली होती. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः भारतीय दूतावासाशी संपर्क साधला होता. त्यानंतर अखेर हालचालींना वेग आला. यानंतर सिंगापूर विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. गुरुवारी रात्री उशिरा हे विद्यार्थी मुंबई विमानतळावर सुखरुप उतरले असून आता या विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात येते आहे. 

 

पाहा व्हिडीओ - 

 

 

कोरोनामुळे आतापर्यंत देशात एकच खळबळ उडाली आहे. सध्या देशातील एकूण 178 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यातील चौघांचा मृत्यू झाला असून, इतरांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

कोरोनामुळे पंजाबमध्ये 70 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय. त्यामुळे देशात कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या ४ वर पोहोचलीय. याआधी कर्नाटक, दिल्ली, महाराष्ट्रात कोरोनामुळे प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मृत व्यक्ती जर्मनीहून इटलीमार्गे मायदेशी परतली होती.  दरम्यान, मंगळवारी 17 मार्चला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाचा देशातील तिसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्याआधी 13 मार्चला दिल्ली आणि कर्नाटकमधील रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती.  

 

हेही वाचा - अमेरिकेत कोरोनावर औषध सापडलं?

हेही वाचा - मुंबईकरांचे कोरोनाशी दोन हात, लोकलप्रवाशांची संख्या घटली

 

 

Indian students in singapour return in india safely marathi india 


संबंधित बातम्या

Saam TV Live