इराणमध्ये अडकलेले भारतीय अडचणीत

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 9 मार्च 2020

इराणची राजधानी असलेल्या तेहरानमध्येही शेकडो भारतीय अडकले आहेत. त्यात देशाच्या वेगवेगळ्या भागातून कामासाठी गेलेल्या नागरिकांचा समावेश आहे. त्यापैकी मुंबई येथील अरविंद जाधव यांच्याशी "सकाळ'ने संपर्क साधला. त्या वेळी त्यांनी ही भावना व्यक्त केली. 

 

पुणे - ""आम्ही तेहरानमध्ये अडकलो आहोत. येथून कधी सुटणार, याची कोणतीच माहिती इराणमधील भारतीय दूतावासातून मिळत नाही. कोणत्याही प्रश्‍नाला "प्रोसेसमध्ये आहे' इतक्‍याच मोजक्‍या शब्दात सातत्याने एकच उत्तर मिळत आहे,'' अशी माहिती इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांनी दिली. त्यामुळे त्यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. 

इराणमध्ये कोरोना विषाणूंच्या संसर्ग झाला आहे. इराणची राजधानी असलेल्या तेहरानमध्येही शेकडो भारतीय अडकले आहेत. त्यात देशाच्या वेगवेगळ्या भागातून कामासाठी गेलेल्या नागरिकांचा समावेश आहे. त्यापैकी मुंबई येथील अरविंद जाधव यांच्याशी "सकाळ'ने संपर्क साधला. त्या वेळी त्यांनी ही भावना व्यक्त केली. 

""भारतीय दूतावासाच्या आम्ही संपर्कात आहोत. पण, तेथून आम्हाला फारशी माहिती मिळत नाही. कोणत्याही प्रश्‍नाला फक्त "प्रोसेसमध्ये आहे' असेच उत्तर मिळते. त्यामुळे माध्यमातून मिळणाऱ्या बातम्यांच्या आधारावरच आम्हाला माहिती मिळत आहे. सध्या आम्ही हॉटेलमध्ये राहात आहे. तेथे पूर्णतः सुरक्षित आहे. पण, येथून बाहेर पडणार तरी कधी, या प्रश्‍नाचे उत्तर मिळत नाही,'' असेही त्यांनी सांगितले. काही शहरांमधून भारतीयांचे आरोग्य नमुने तपासण्यासाठी घेऊन गेल्याची माहिती कळाली. पण, आमचेही घशातील द्रव पदार्थाचे नमुने घेणार आहेत का, की तपासणी करून घेऊन जाणार आहेत, याचे कोणतेच उत्तर भारतीय दूतावासाकडून मिळत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

WEB TITLE- Indians stuck in Iran in trouble


संबंधित बातम्या

Saam TV Live