इंदोरीकरांच्या "त्या' वक्‍तव्याचे पुरावे दिले, "अंनिस'चा दावा

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

कीर्तनकार निवृत्ती देशमुख महाराज (इंदोरीकर) यांच्या "त्या' वक्तव्याप्रकरणी सायबर पोलिसांनी क्‍लीन चिट दिली असताना, आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हा शल्यचिकित्सकांना "त्या' व्हिडिओबाबतचे पुरावे दिले आहेत. 

पुरावे देऊनही कारवाई न झाल्यास इंदोरीकरांसह जिल्हा शल्यचिकित्सकांविरुद्ध फिर्याद दाखल करू, असा इशारा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यवाह ऍड. रंजना गवांदे यांनी आज दिला. 

इंदोरीकर महाराजांच्या मूल जन्माबाबत आणि महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि अन्य काही संघटनांनी जिल्हा शल्यचिकित्सक व पोलिसांकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. "पुरावे दिल्यास कारवाई करू', अशी भूमिका जिल्हा शल्यचिकित्सकांनी घेतली होती. सायबर सेल पोलिसांनी इंदोरीकरांचे व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध नसल्याचा अहवाल दिला होता. 

दरम्यान, "अंनिस'ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की इंदोरीकर यांनी मूल जन्माबाबतचे वादग्रस्त वक्तव्य उरण तालुक्‍यातील इंचगिरी येथे दोन जानेवारी रोजी केले होते. ते सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर यू-ट्यूब चॅनेलवर दबाव आणून ते व्हिडिओ डिलीट करण्यात आले. इंदोरीकर यांनी असेच वक्तव्य फेब्रुवारी 2019 मध्ये नगर जिल्ह्यातील शेलद येथेही केले आहे. 

इंदोरीकरांच्या विधानावरून चर्चा सुरू झाल्यानंतर 12 फेब्रुवारी 2020 रोजी नोटीस पाठविली. त्यानंतर इंदोरीकर यांनी बीड येथे कीर्तनात त्या वादग्रस्त विधानाचे समर्थन केले. त्यानंतर दिलगिरी व्यक्त केली. 

सरकारी वकील आणि वरिष्ठ कार्यालयाचे मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल. 
 
WEB TITLE- Indiskar's statement "gave evidence of that statement," Annis claims

संबंधित बातम्या

Saam TV Live