लडाखमध्ये पुन्हा भारतीय-चिनी सैनिक आमनेसामने, ‘हॉट स्प्रिंग’वर चिनी सैनिक परतले..

साम टीव्ही
रविवार, 12 जुलै 2020

चिनी सैन्याच्या आगळीकीमुळे पुन्हा एकदा पूर्व लडाखमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीय. लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवर चर्चेच्या फेऱ्या झाल्यानंतर सैनिक मागे हटवण्यास दोन्ही देशांनी होकार दर्शवला खरा, मात्र चिनी सैनिकांनी या तहाला हरताळ फासत, पुन्हा पेट्रोलिंग पॉईंट पंधरा म्हणजेच हॉट स्प्रिंगमध्ये तळ ठोकलाय. 

चिनी सैन्याच्या आगळीकीमुळे पुन्हा एकदा पूर्व लडाखमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीय. लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवर चर्चेच्या फेऱ्या झाल्यानंतर सैनिक मागे हटवण्यास दोन्ही देशांनी होकार दर्शवला खरा, मात्र चिनी सैनिकांनी या तहाला हरताळ फासत, पुन्हा पेट्रोलिंग पॉईंट पंधरा म्हणजेच हॉट स्प्रिंगमध्ये तळ ठोकलाय. हॉट स्प्रिंगसह पँगाँग सरोवराच्या ठिकाणावरूनही चिनी सैन्याने माघारी फिरण्यास नकार दिलाय. 

लडाखच्या या दोन्ही परिसरात दोन्ही सैन्यांमध्ये तणावाचे वातावरण कायम आहे. हॉट स्प्रिंग परिसरातून चीनने आपले सैनिक न हटविल्याने भारतानेही येथे सैन्य तैनात केलंय. शुक्रवारी चीनने आपले सर्व तंबू उखडून टाकत माघार घेतली होती. मात्र काल सकाळी पुन्हा 50 हून जास्त चिनी सैनिक या भागात दिसले. हॉट स्प्रिंगवर तेवढेच भारतीय जवान तैनात करण्यात आलेले आहेत, जेवढे चीनने तैनात केलेले आहेत.

तिबेट सीमेवरील गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षानंतर भारत आणि चीनमधले संबंध ताणले गेलेत. हा तणाव कमी व्हावा यासाठी प्रयत्न सुरू झाले होते, भारत आणि चीनमधील राजनैतिक स्तरावरील चर्चाही झाल्या. सैन्या मागे हटल्याचीही माहिती होती. मात्र अचानक पुन्हा काय झालं आणि युद्धाची स्थिती निर्माण झाली? असाच प्रश्न सर्वांना पडलाय.

भारत-चीन सैन्यातील हिंसक संघर्षाला 1 दिवस उलटत नाही तोच, चीनी सैन्यानं डोंगराळ भागात अत्याधुनिक शस्‍त्रांस्त्रासह सराव केल्याची माहिती ग्लोबल टाइम्सनं दिली होती. यासंदर्भातला एक व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होती. भारत-चीन सीमेवरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा युद्धाभ्यास केल्याचं ग्लोबल टाइम्स या सरकारी प्रसारमाध्यमानं म्हटलंय. या व्हिडिओमध्ये चीनी सैनिक रणगाडे आणि इतर साहित्यासह युद्धाभ्यास करतांना पाहायला मिळतायत. त्यामुळे चीन शांत बसणाऱ्यातला नाही हेच पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. आता पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं  असेल.


संबंधित बातम्या

Saam TV Live