भारत-चीनचं सैन्य आमने सामने, दोन्ही बाजूने सैन्याची मोठी जमवाजमव सुरू

साम टीव्ही
सोमवार, 21 सप्टेंबर 2020
  • भारत-चीनचं सैन्य आमने सामने
  • पँगाँग तलाव परिसरात पडली गाठ
  • 4 ठिकाणी सैन्य एकमेकांपासून हाकेच्या अंतरावर

भारत चीनदरम्यानचा तणाव निवळण्यासाठी दोन्ही बाजूनी शांततेची चर्चा सुरू आहे. पण तरीही सीमेवर दोन्ही बाजूने सैन्याची मोठी जमवाजमव सुरू आहे. काही ठिकाणी तर दोन्ही बाजूचे सैनिक एकमेकांपासून हाकेच्या अंतरावर आहेत. 

भारत चीन दरम्यानचा तणाव शिगेला पोहोचलाय.त्यामुळे सीमेवर दोन्ही बाजुच्या सैन्याच्या हालचालींना वेग आलाय. पँगाँग तलाव परिसरात चार ठिकाणी तर दोन्ही देशाच्या सैन्यामध्ये अवघ्या काही मीटरचं अंतर शिल्लक राहिलंय. 

पँगाँग तलावाच्या उत्तर किनाऱ्यावर फिंगर तीन आणि फिंगर चार या टेकड्यांवर दोन्ही देशांचे जवान एकमेकांना पाहू शकतात, इतक्या जवळ आलेत. शिवाय हवेत गोळीबार करत एकमेकांना इशारे दिले जातायत. तर तलावाच्या दक्षिण किनाऱ्यावर स्पँगुर गॅप, मुखपारी आणि रेयांग ला परिसरात तर दोन्ही बाजूचं सैन्य अगदी एकमेकांपासून अवघ्या काही मीटरचं अंतर राखून आहे. या तीनही ठिकाणी 8 सप्टेंबरला दोन्ही सैन्यामध्ये गोळीबार झालाय.  

गेल्या 10 दिवसांपासून या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. पण फिंगर 3 और 4 या दोन टेकट्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न सातत्याने चीनने केलाय. मात्र भारतीय सैन्याच्या प्रखर विरोधामुळे चीनचे हे मनसुबे अद्याप तरी यशस्वी झालेले नाहीत.


संबंधित बातम्या

Saam TV Live