तीर्थक्षेत्र आळंदीतुन वाहणारी पवित्र इंद्रायणी नदी अक्षरशः गटारगंगा

गोपाल मोटघरे
गुरुवार, 6 मे 2021

तमाम वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली पवित्र इंद्रायणी नदी. या नदीत थेट सोडल्या जाणाऱ्या रसायन युक्त आणि मैल मिश्रित पाण्यामुळे इंद्रायणी नदीची घाण अवस्था झाली आहे.

पुणे : इंद्रायणी नदचे Indrayani river शुभ्र पात्र बघून तुम्हाला वाटलं असेल ही एखाद्या बर्फाळ प्रदेशातील हिमनदी आहे.  मात्र जरा थांबा ही आहे तमाम वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली पवित्र इंद्रायणी नदी. या नदीत थेट सोडल्या जाणाऱ्या रसायन युक्त आणि मैल मिश्रित पाण्यामुळे इंद्रायणी नदीची घाण अवस्था झाली आहे. The Indrayani river is polluted due to mix of dirty water

शरिरातील सर्व इंद्रिये पवित्र करते म्हणून या नदीला इंद्रायणी म्हटले जाते. इथे येणारा प्रत्येक भाविक आचमन केल्या शिवाय माऊलींच समाधी दर्शन घेत नाही. मात्र आता ह्या नदीच्या पाण्याचं अक्षरशः विषात रूपांतर झाले आहे.

हे देखील पहा - 

ज्यामुळे या नदीत आढळणारा देवमासा महाशिर तर कधीच नामशेष झाला आहे. आणि आता इतरही जलचर असे तडफडून मरत आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ Maharashtra Pollution Control Board आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थानीही याकडे दुर्लक्ष केले आहे. 

काळाची गरज ओळखून भारती हॉस्पिटलने उभा केला स्वतःचा लिक्विड ऑक्सिजन प्लांट

"नमामी गंगे"च्या धर्तीवर ,"नमामी इंद्रायणी" ही नदी स्वच्छतेसाठी योजना केल्या गेलेली घोषणा हवेतच विरल होऊन गेल्या आहेत. त्यासाठी उभारलेल्या शेकडो कोटींचा निधी कुठे मुरतोय हे मूग गिळून गप्प बसलेले या परिसरातील हे लोकप्रतिनिधीनीच सांगू शकतील. तूर्तास तरी आळंदिकर कोरोना आणि इंद्रयाणीच्या विषाच्या विळख्यात सापडले आहेत हेच खरं !

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live