भाजप नेत्या पंकजा मुंडेंना कोरोनाची लागण....!

विनोद जिरे
गुरुवार, 29 एप्रिल 2021

भाजपा नेत्या पंकजा मुंडेंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना स्वतः ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे

बीड : भाजपा BJP नेत्या पंकजा मुंडे Pankaja Munde यांना कोरोनाची Corona लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट Tweet करून यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात Maharastr कोरोना फोफावत आहे. आता तर हा कोरोना थेट मुंडे कुटुंबात शिरला आहे. पंकजा मुंडेंना यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. Infection of corona to Pankaja Munde

गेल्या ४ ते ५ दिवसांपासून त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन  Quarantine करुन घेतलं होतं. आज त्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह Positive आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्या म्हणाल्या, की "माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून, मी अगोदरच घरामध्ये स्वतःला विलगीकरण करून घेतलं होत. मी काही दिवसांपूर्वी कोरोना बाधितांच्या परिवाराच्या भेटी घेतल्या होत्या. तेव्हा लोकांच्या संपर्कात आले होते. माझ्या समवेत दौऱ्यात असणार्‍या लोकांनी कोरोना टेस्ट Test करून  काळजी घ्यावी." असं ट्विट पंकजा मुंडेंनी केलं आहे.

Edited By- Digambar Jadhav

 


संबंधित बातम्या

Saam TV Live