पाकिस्तानात महागाई गगनाला भिडली , हजार रूपयांना आलं तर साडेतिनशे रूपयांना डझनभर अंडी

साम टीव्ही
शुक्रवार, 12 मार्च 2021

पाकिस्तानात महागाई गगनाला भिडली 

जनतेवर आलीय उपासमारीची वेळ

हजार रूपयांना आलं तर साडेतिनशे रूपयांना डझनभर अंडी

 

पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस खराब होत चाललीय. पाकिस्तानात आता आलं 1000 रूपये तर एक अंड 30 रूपयांना मिळतय

अतिरेक्यांचं माहेर घर असलेल्या पाकिस्तानाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत चाललीय. पाकिस्तानात जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडलेत.नागरिकांच जगण मुश्किल झालं असून इम्रान खान सरकारवर नागरिक आग पाखड करतायत

 1 किलो चिकन 370 रू. 
1 किलो साखर 104 रू.
1 किलो गहू 60 रू.
1 डझन अंडी 350 रू.
 1 किलो आलं 1000 रू.

 पाकिस्तानातील 25 टक्के जनता दारिद्र रेषेखाली असून प्रत्येक घरात अंड प्रामुख्याने खाल्ल जातं.गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये महागाई वाढतेय. वाढलेल्या किंमतीमुळे व्यापारी आणि उत्पादकांमध्ये चिंता वाढलीय कारण या किंमती वाढल्यानं कच्च्या मालाची आणि चाराच्या किंमतीत आश्चर्यकारक वाढ नोंदवण्यात आलीय. अनेक व्यापारी आणि विक्रेते बाहेरच्या देशातून कच्चा माल आयात करण्याच्या विचारात आहेत. 

दुसरीकडे सर्वच गोष्टी महाग झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होतायत. वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलीय . दुसरीकडे इमरान खान साखरेचे दर 102 रुपयांवरुन 81 रुपये केल्याचं श्रेय घेत स्वतःच्या सरकारचं कौतुक करण्यात गुंग आहेत. त्यामुळे अशा स्थितीत सर्वसामान्यांना दिलासा कसा मिळणार हाच प्रश्न आहे. 

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live