VIDEO | बाबरी मशीद प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता तर निकालाबाबत ओवैसींचा सरकारला संतप्त सवाल...

साम टीव्ही
बुधवार, 30 सप्टेंबर 2020
  • 'बाबरी मशीद जादूने पडली का ?'
  • 'निकालातून काय संदेश द्यायचाय ?'
  • 'मशिद पडली तेव्हा मिठाई वाटली गेली'
  • निकालातून न्याय मिळाला नाही-ओवैसी

बाबरी विध्वंसप्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. आज तब्बल 28 वर्षांनी सीबीआयच्या विशेष कोर्टानं हा मोठा आणि महत्त्वाचा निकाल दिलाय. या प्रकरणात एकूण 49 आरोपी होते त्यातील 17 आरोपींचा खटल्याच्या सुनावणीदरम्यान मृत्यू झाला.

उरलेल्या सर्वच 32 आरोपींची खटल्यातून निर्दोष सुटका करण्यात आलीय. या निकालामुळे लालकृष्णी अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती या दिग्गज नेत्यांसह सर्वच आरोपींना मोठा दिलासा मिळालाय. बाबरी पाडण्याचा कट पूर्वनियोजित नव्हता, बाबरी पाडण्याचा कट नसून ही अचानक घडलेली घटना होती असंही कोर्टानं म्हंटलंय. या निकालानंतर सर्व निर्दोष सुटलेल्यांनी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करत आनंद व्यक्त केलाय.

बाबरी प्रकरणात कुणा कुणाची निर्दोष मुक्तता झालीय, पाहा -

बाबरी मशीद विध्वंसप्रकरणी सीबीआयच्या विशेष कोर्टानं दिलेल्या निकालाचं शिवसेनेनं स्वागत केलंय. आपल्याला हाच निकाल अपेक्षित होता अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिलीय. या प्रकरणी संजय राऊत यांनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांचं अभिनंदन केलंय.

दरम्यान, बाबरी मशिद जादूनं पडली का? असा संतप्त सवाल असदुद्दीन ओवैसींनी उपस्थित केलाय. बाबरी निकालातून न्यायव्यवस्थेला नेमका कोणता संदेश द्यायचाय असा सवालही ओवैसींनी विचारलाय. हा निकाल अन्यायकारक होता, अशीही प्रतिक्रिया ओवैसींनी दिलीय. सीबीआयनं वरच्या कोर्टात जायला हवं, अन्यथा मुस्लिम पर्सनल बोर्डानं निकालाविरोधात दाद मागावी, अशीही प्रतिक्रिया ओवैसींनी दिलीय. ओवैसी नेमकं काय म्हणालेत. पाहुयात.


संबंधित बातम्या

Saam TV Live