लॉकडाऊन असूनही कलिंगड पिकाचे लाखोचे उत्पादन, मावळ मधील चांडखेल येथील शेतकऱ्याचा नवा प्रयोग

दिलीप कांबळे
सोमवार, 3 मे 2021

मावळ मधील  चांदखेड येथील शेतकऱ्यांकडून शेताच्या बांधावर कलिंगड विक्रीचा अभिनव प्रयोग सुरु आहे. राज्य शासनाच्या विकेल ते पिकेल अभियानांतर्गत चांदखेड येथील कृषीनिष्ठ शेतकरी नितीन गायकवाड यांनी थेट आपल्या शेताच्या बांधावर शेतकरी ते ग्राहक अशी कलिंगड विक्री सुरु केली

पुणे : मावळ Maval मधील चांदखेड Chandkhed येथील शेतकऱ्यांकडून शेताच्या बांधावर कलिंगड विक्रीचा अभिनव प्रयोग सुरु आहे. राज्य शासनाच्या विकेल ते पिकेल अभियानांतर्गत चांदखेड येथील कृषीनिष्ठ शेतकरी नितीन गायकवाड Nitin Gaikwad यांनी थेट आपल्या शेताच्या बांधावर शेतकरी ते ग्राहक अशी कलिंगड विक्री सुरु केली, असून त्याला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. An innovative experiment of selling Watermelon by a farmer from Chandkhed in Maval

गेल्यावर्षी लाॅकडाऊनच्या Lockdown काळात गायकवाड यांची कलिंगड विक्रीसाठी आल्यानंतर लाॅकडाऊनमुळे सर्व मार्केट Market बंद असल्या कारणांने आता कलिंगडाचे करायचे काय? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता. परंतु हताश न होता सोशल मिडियाचा वापर करत गायकवाड यांनी आपली कलिंगडे शेताच्या बांधावरच विकायला सुरुवात केली आहे. 

कलिंगड Watermelon पिकासाठी जीवामृताचा वापर तसेच दुध व गुळाची एकत्रित केलेली स्लरी याचा डोस ठिंबक सिंचनाद्वारे देऊन तयार केलेली कलिंगडे चवीला गोड, आणि रंगाने लालभडक होत आहे. संपुर्णपणे सेंद्रिय पध्दतीने कलिंगड पिक घेत असल्याने, इतर कलिंगडापेक्षा आमच्या कडील कलिंगड चवीला गोड असल्याचे येणारे ग्राहक सांगत आहेत. गायकवाड यांच्याकडे ८ एकर जमीन त्यातील अडीच एकरात यांनी कलिंगड घेण्यास सुरुवात केली आहे. An innovative experiment of selling Watermelon by a farmer from Chandkhed in Maval

आतापर्यंत १५ रुपये किलो प्रमाणे ४० टन कलिंगडाची विक्री केली आहे. हाकेच्या अंतरावर हिंजवडी आयटी पार्क आहे. जवळच नेरे, मारुंजी या गावातील नागरिक थेट बांधावर कलिंगड घेण्यासाठी येतात. शेतात आल्यानंतर आपल्या पसंतीचा फळ झाडापासून वेगळ करून त्याचं वजन करून पैसे दिले जाते. त्यामुळे लॉक डाऊन असूनही गायकवाड कुटुंबीयांना लाखोचे उत्पादन होत असताना दिसत आहे. 

Edited By- Digambar Jadhav
 


संबंधित बातम्या

Saam TV Live