पालकमंत्र्यांच्या शासकीय बैठकीत सत्ताधारी आमदारांचा अवमान

mla
mla

चंद्रपूर - सत्ताधारी काँग्रेसच्या दोन आमदारांचा शासकीय बैठकीत अवमान Insult झाल्याने या आमदारांनी बैठकीवरच बहिष्कार Boycott टाकल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सत्ता काँग्रेसची, पालकमंत्री Guardian Minister काँग्रेसचे Congress आणि आमदारही काँग्रेसचेच. असे असतानाही हे मानापमान नाट्य घडल्याने काँग्रेसमध्ये काय चाललं आहे, हे दिसून आलं. Insult to the ruling MLAs in the meeting

चंद्रपूर Chandrapur शहरातील नियोजन भवनात आज जिल्हास्तरीय खरीप हंगामा आढावा बैठकीचे आयोजित करण्यात आली होती. पालकमंत्री विजय वडेट्टीवार बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीच्या बैठक व्यवस्थेवरून चांगलेच मानापमान नाट्य रंगले.

हे देखील पहा -

अधिकारी वर्ग मंचावर तर आमदारांना प्रेक्षकांमध्ये बसविल्याने सत्ताधारी काँग्रेसचे आमदार संतप्त झाले. बैठकीला सुरुवात होताच राजुरा क्षेत्राचे काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने या बैठकीतून काँग्रेसचे दोन आमदार व खासदार यांनी निषेध करत बहिर्गमन केले. Insult to the ruling MLAs in the meeting

बैठकीत प्रोटोकॉलचे पालन न झाल्याने हे आमदार संतापले. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनीही पाठोपाठ वॉकआउट केले. हंगाम तोंडावर आला आहे. लोकप्रतिनिधींना अनेक विषय मांडायचे होते; मात्र त्यांचा अपमान झाला, असे बहिर्गमन करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी स्पष्ट केले. या बहिर्गमनानंतर काही वेळातच पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी बैठकच रद्द  केली. पालकमंत्री काँग्रेसचे आणि अपमान देखील काँग्रेसच्याच आमदारांचा झाल्याने राजकीय-प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com