मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव, वाचा कुणी केली महाराष्ट्राची नियोजनपुर्वक बदनामी?

साम टीव्ही
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020
  • मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव
  • नियोजनपुर्वक केली बदनामी
  • प्रतिमा मलीन करण्यासाठी 80 हजार फेक अकाऊंट्स महाराष्ट्र सायबर सेलचा अहवाल

सुशांत सिंह प्रकरणी महाराष्ट्र सरकारची बदनामी करण्याचा डाव उघड झालाय. पोलिस आणि राज्य सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित करत हा तपास सीबीआयसारख्या राष्ट्रीय तपास यंत्रणांकडे सोपवला गेला. पण या मोहिमेमागे नियोजनबद्ध रणनीती असल्याचे पुरावे महाराष्ट्र सायबर सेलला मिळालेत. बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करणारी तब्बल 80 हजार फेक अकाऊंट्स सायबर सेलने पकडलीएत. पाहूयात या बदनामी मोहिमेसाठी कुणी सुपारी दिली होती. 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्या मजकुराचा सोशल मीडियावर पूर आला होता. ही बदनामी करणारी अकाऊंट्स आता मुंबई सायबर सेलच्या रडारवर आलीएत. 

अशा अनेक अकाऊंट्सची तपासणी केली असता यापैकी थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 80 हजार अकाऊंट्स बनावट असल्याची धक्कादायक बाब समोर अलीय. त्याहीपेक्षा धक्कादायक बाब म्हणजे सुशातच्या मृत्यूनंतर लगेचच 14 जूनपासून ही अकाऊंट्स उघडली गेल्याची बाब मुंबई सायबर सेलच्या अहवालात नमूद करण्यात आलीय. यापैकी बहुतांश फेक अकाऊंट्स तुर्की, इंडोनेशिया, जपान, आणि थायलंड या देशांमध्ये तयार करण्यात आली होती.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासावर संशय व्यक्त करण्यात आला. मुंबई पोलिस कुणाला तरी वाचवू पाहत असल्याचा आरोपही करण्यात आला. यामागे राज्य सरकारमधले बडे मंत्री असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र एम्सच्या अहवालानुसार सुशांतने आत्महत्या केल्याचं सिद्ध झाल्यानंतर आरोप करणाऱ्यांनी चुप्पी साधलीय. महाराष्ट्राविरोधातली बदनामी मोहिमही थंडावलीय. त्यामुळे आता या बनावट अकाऊंट्सचा बोलवता धनी नेमका कोण होता याचा तपासही सायबर सेलने करावा.


संबंधित बातम्या

Saam TV Live