मंदीरात झालेल्या चोरीचा तपास पोलिसांनी लावला चुटकीसरशी !

The investigation of theft at the temple was completed in 4 hours
The investigation of theft at the temple was completed in 4 hours

उल्हासनगर: बुधवारी विठ्ठलवाडी Vitthalwadi पोलीस स्टेशनच्या हद्दीत कुर्ला कॅम्प परिसरात जय अंबे माता मंदीरात चोरी झाली होती. हा चोरीचा गुन्हा विठ्ठलवाडी पोलिसांनी Police चार तासात उघडकीस आणल्याने भक्तगण विठ्ठलवाडी पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत. The investigation of theft at the temple was completed in 4 hours

विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कुर्ला कॅम्प परिसरात जय अंबे माता मंदीरात बुधवारी दुपारी बारा ते सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान चोरी झाली होती. मंदीराच्या मागील बाजूस असलेल्या जाळीच्या उघड्या दरवाज्यावाटे अज्ञात चोरानी मंदिरात प्रवेश करून एकुण सव्वा लाख रुपये किंमतीचे सोने, चांदी, ॲल्युमिनीयम आणि पितळेच्या वस्तु, मूर्ती तसेच दानपेटी व त्यातील रोख रक्कम असा मुद्देमाल चोरी करून नेला होता. 

या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया धोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक एस.डी राजपुत यांनी तात्काळ घटना स्थळी जाऊन गुप्त बातमीदार व सी.सी.टी.व्ही फुटेजच्या मदतीने तपास केला. 
उल्हासनगर Ulhasnagar कॅम्प क्रमांक पाच भागात असलेल्या कैलास कॉलनी येथुन तीन लहान मुलांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी जय अंबे माता मंदीरामध्ये चोरी केल्याचे कबुल केले. त्यांच्या कडून ऐंशी हजार रुपयांचे सोन्याचे दागिने मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. 

तसेच या मुलांनी बाकीचा चोरीचा मुद्देमाल हा भंगार विक्री करणाऱ्या शकिल मोहमद अहमद यांच्याकडे दिल्याचे सांगीतले. त्याप्रमाणे लागलीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून त्याच्या घराची झडती घेतली. त्याच्या घरामध्ये मंदीरातील चोरी गेलेले अॅल्युमिनीयमच्या व पितळेच्या देवी देवतांच्या मुर्त्या, त्रीशुल व दान पेटी असा एकुण पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हे देखील पहा - 

सदर गुन्ह्यातील आरोपीतांचा काही एक धागादोरा नसतांना गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अमलदार यांनी तांत्रिक पध्दतीचा वापर केला. अथक मेहनत करून उप आयुक्त प्रशांत मोहिते, मार्गदर्शनाखाली विठ्ठलवाडी पोलिसांनी केवळ चार तासात या चोरीचा छडा लावल्याने पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या प्रकरणातील चोरी गेलेली सर्व सव्वा लाख रुपयांची मालमत्ता हस्तगत केली आहे.  

Edited By-Sanika Gade
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com