IPL Play Off : कुठल्याही संघावर पैजा लावू नका...

 IPL Play Off : कुठल्याही संघावर पैजा लावू नका...

IPL चे साखळी सामने संपले आहेत. चार संघ प्ले ऑफला पात्र झाले आहेत. साखळी सामन्यातली सर्व संघाची सर्व सामन्यातिल कामगिरी आणि गुणतक्ता बघून लक्षात येईल की कुठलाच संघ अजिंक्य(invincible) नाही. फलनदाजी आणि गोलनदाजी ह्यातिल किर्ती आणि प्रतिभा यांना साजेसा  दरारा प्रस्थापित करण्यात मुंबईचा संघ यशस्वी झाला असे म्हणता येईल. पहिल्या तीन सामन्यानंतर सलग 5 विजय मिळवल्या मुळे हा संघ unbeatable आहे असं वाटत असताना पुढच्या सहा सामन्यात तीन सामने हरल्याने क्रिकेट मध्ये हुरळून कुठलेही आडाखे तत्परतेने बांधू नयेत ह्याची पुन्हा प्रचिती दिली गेली. दिल्लीची दुसऱ्या स्थानावर उडी पाठीराख्याना सुखावणारी आहे. त्यांचेही बॅटिंग आणि बॉलिंग मधले संतुलन चांगले आहे. दोन्ही डिपार्टमेंट मध्ये सिद्ध झालेले मॅच विनर्स आहेत.

जिंकण्याची लय हा आत्मविश्वासाच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक असतो.तो लक्षात घेतला तर हैदराबादने शेवटचे तीन सामने सफाईदारपणे जिंकले आहेत.त्यामुळे प्ले ऑफ मध्ये जाताना त्यांना फील गुड ची साथ मिळेल.त्या उलट RCB ने शेवटचे सलग 4 सामने गमावलेले आहेत.

ही सगळी आकडेवारी आणि सांख्यिकीचा उहापोह केला तरी महत्वाचे असते की कुठल्याही संघाला दुसऱ्या विशिष्ट संघांविषयी खेळताना  दडपण येते का? सर्व संघात असलेले कमालीचे प्रतिभावान,यशस्वी आणि व्यावसायिक खेळाडू लक्षात घेता आणि सद्ध्याच्या खेळाडुंचा दृष्टिकोन आणि खेळाडूंच्या खेळाचे एकमेकांना बारकावे माहीत आहेत हे बघता कुणीच कुणाचे दडपण घेत नाही हे दिसते. 

प्ले ऑफ मध्ये क्रिकेटच्या कौशल्या इतकीच मानसिक क्षमता पणाला लागते.त्यामुळे कुठला कर्णधार अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती सुदधा शांत चित्ताने कल्पनाशक्ती वापरतो आणि कुठला संघ संपूर्ण सामन्याकडे न बघता प्रत्येक चेंडूंचा कसा सामना करायचा एव्हढ्यावरच एकाग्र राहील तो पुढे जाईल.
मोठ्या नावांवर न जाता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर अमुक एका संघावर पैज लावणे जोखमीचे आहे हे लक्षात येईल.
त्यामुळे पैजे पेक्षा खेळातल्या मौजेवर लक्ष देणे मस्तं.
Haapy viewing दोस्तांनो.


 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com