Big Breaking - बायो बबलमध्ये कोरोना : IPLस्थगित

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 मे 2021

देशातल्या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरु असलेले आयपीएलचे सर्व सामने स्थगित करण्यात आल्याची माहिती क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली आहे

नवी दिल्ली : देशातल्या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरु असलेले आयपीएलचे सर्व सामने स्थगित करण्यात आल्याची माहिती क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली आहे. IPL Suspended as Corona infiltrated in Bio Bubble

इंडियन प्रिमिअर लिगच्या IPL उर्वरित सामन्यांवर कोरोनामुळे Corona प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते . आयपीएलच्या विविध संघातील अनेक खेळांडूना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे उर्वरित सामन्यांबाबत विचार केला जात होता. कोलकाता नाईट रायडर्सच्या Kolkata Night Riders दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर रॉयल चॅलेंजर्सविरुध्दचा Royal Challengeres Bengluru सामना पुढे ढकलण्यात आला होता. 

दुसरीकडे चेन्नईच्या Chennai तीन खेळाडूंनाही कोरोनाने घेरले. आयपीएल खेळाडूंच्या सुरक्षेसाठी केलेल्या बायो-बबलमध्येच Bio Bubble कोरोनाने घुसखोरी केली. त्यामुळे आता आयपीएलचे सामने स्थगित करणे भाग पडले आहे.  यामुळे बीसीसीआयच्या चिंतेत मोठी भर पडली. त्यामुळे आयपीएलचे पुढील सामने रद्द करण्यात आले. IPL Suspended as Corona infiltrated in Bio Bubble

कोलकाता नाईट रायडर्सच्या दोन खेळाडूंना सोमवारी कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आल्यानंतर बंगळूरविरुद्धचा सामना पुढे ढकलण्यात आला. संदीप वॉरियर आणि वरुण चक्रवर्ती हे दोन खेळाडू सध्या होमक्वारंटाईन कक्षात असून त्यांच्यावर आरोग्य तज्ञ लक्ष ठेवून आहेत. दरम्यान कोलकाता नाईट रायडर्स संघ देखील विलगीकरकण कक्षामध्ये आहे.
Editd By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live