IPL 2021: पुन्हा होणार सुरु; सामन्यांच्या तारखा झाल्या जाहिर

ipl 2021.
ipl 2021.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) युएईमध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग 2021 (IPL) च्या तारखा निश्चित केल्या आहेत. दुसर्‍या टप्प्यातील पहिला सामना 17 सप्टेंबर रोजी खेळला जाईल, तर अंतिम सामना 15 ऑक्टोबरला होणार आहे. बातमी एजन्सी एएनआयशी बोलताना बीसीसीआयच्या अधिककाऱ्यांनी सांगितले की ''बीसीसीआय आणि अमीरात क्रिकेट बोर्ड यांच्यात चर्चा झाली. आयपीएलचे उर्वरित सामने दुबई, शारजाह आणि अबू दाबी येथे यशस्वीपणे पार पडतील याचा विश्वास भारतीय नियामक मंडळाला आहे''.(The IPL will start on September 17)

एएनआयशी बोलताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की अमीरात क्रिकेट बोर्डा सोबत चर्चा खरोखरच चांगली झाली. बीसीसीआयच्या बैठकी अगोदरच अमीरात क्रिकेट बोर्डाने स्पर्धेचे आयोजन करण्यास तोंडी मान्यता दिली होती. बीसीसीआयची बैठक मागच्या आठवड्यात झाली होती. उर्वरित सामने आयोजित करण्यासाठी बीसीसीआय नेहमीच 25 दिवसांची विंडो शोधात आहे.

हे देखील पाहा

परदेशी खेळाडूंच्या उपलब्धते संदर्भात विचारले असता अधिकारी म्हणाले की ''चर्चा सुरू आहे आणि बीसीसीआयला सकारात्मक निकालाची अपेक्षा आहे''. ते म्हणाले, "आमची चर्चा सुरू झाली आहे आणि आम्हाला परदेशी खेळाडू उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे. जर काही खेळाडू येऊ शकले नाहीत तर आपण पुढे काय करायचे ते ठरवू''. पुढे ते म्हणाले 14 व्या हंगामाचे आयोजन शानदार होणार आहे.(The IPL will start on September 17)

फ्रेंचायझींना असा विश्वासही आहे की बीसीसीआय परदेशी मंडळांशी सकारात्मक चर्चा करून, उर्वरित सामन्यांसाठी खेळाडू उपलब्ध करून देईल. कोरोनाच्या दुसर्‍या लाटे दरम्यान एप्रिल-मेमध्ये भारतात आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. काही खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी संसर्गित झाल्याचे लक्षात आल्यानंतर मेच्या सुरूवातीस आयपीएलचा हंगाम तहकूब करावा लागला होता. आतापर्यंत 29 सामने आयोजित करण्यात आले असून 31 सामने बाकी आहेत.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com