ईशा अंबानीचे आनंद पिरामलशी दणक्‍यात लग्न

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

मुंबई - यंदा पार पडलेल्या बिग फॅट लग्नांमध्ये सगळ्यात दणक्‍यात भव्यदिव्य असे लग्न पार पडले ते व्यावसायिक मुकेश अंबानी यांच्या मुलीचे ईशा अंबानीचे. व्यावसायिक अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल याच्याशी ईशाचा लग्नसोहळा पार पडला. मुकेश अंबानी यांचे घर मुंबईतील ऍन्टिलियामध्ये हा विवाहसोहळा पार पडला.

लग्नाआधीपासूनच ऍन्टिलिया रोषणाईमध्ये सजले होते. आज ईशाच्या लग्नासाठी आनंद पिरामलची वरात पारंपरिक ताशाच्या गजरात आली.
मुकेश आणि अनिल अंबानी यांचे व्यावसायिक मित्र; तसेच अमेरिकेच्या माजी सचिव हिलरी क्‍लिंटन, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हेही या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. ईशाचे भाऊ अनंत आणि आकाश यांनी तिच्या लग्नाला आलेल्या पाहुण्यांचे स्वागत घोड्यावर बसून केले. त्यांच्याबरोबर त्यांच्या होणाऱ्या पत्नी श्‍लोका मेहता आणि राधिका मर्चंटही उपस्थित होत्या. आनंद पिरामल हाही विंटेज कारमधूनच वरातीबरोबर लग्नासाठी आला होता.

या लग्नसोहळ्याला बॉलिवूडमधील अमिताभ-जया बच्चन, मुलगी श्‍वेता आणि नात नव्या नवेली यांच्याबरोबर उपस्थित होते. तसेच ऐश्‍वर्या-अभिषेक आपली मुलगी आराध्या यांच्याबरोबर आले होते. आलिया भट्ट, आमीर खान-किरण राव, प्रियांका चोप्रा- निक जोनास, शिल्पा शेट्टी, गौरी खान, करण जोहर, कियारा अडवाणी, हृतिक रोशन, सचिन तेंडुलकर आण कुटुंब या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. पारंपरिक गुजराती पद्धतीचा शाही लग्नसोहळ्याची झलक उपस्थितांना पाहायला मिळाली.

Web Title: isha ambani and anand piramal Marriage

संबंधित बातम्या

Saam TV Live