लवकरच  ‘इस्रो’ करणार अंतराळात एक नवा प्रयोग

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

इस्रोच्या चांद्रयान-2 मोहिमेनंतर आता इस्रोने पुन्हा एकदा अंतराळ संशोधनात आपली छाप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुन्हा एकदा एक कठिण मोहीम इस्रो हाती घेणार आहे.रावी लागते, ताशाच प्रकारचं हे अभियान आहे. ‘स्पेडेक्स’ म्हणजेच ‘स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट’ असं या मोहिमेचं नाव आहे,” अशी माहिती डॉ. सिवन यांनी दिली. “सध्या सरकारकडून या मोहिमेसाठी 10 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या मोहिमेसाठी पीएसएलव्ही रॉकेटच्या माध्यमातून दोन उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहेत. अवकाशात सोडल्यानंतर या उपग्रहांची गती कमी करून त्यांना एकमेकांशी जोडलं जाणार आहे.

इस्रोच्या चांद्रयान-2 मोहिमेनंतर आता इस्रोने पुन्हा एकदा अंतराळ संशोधनात आपली छाप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुन्हा एकदा एक कठिण मोहीम इस्रो हाती घेणार आहे.रावी लागते, ताशाच प्रकारचं हे अभियान आहे. ‘स्पेडेक्स’ म्हणजेच ‘स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट’ असं या मोहिमेचं नाव आहे,” अशी माहिती डॉ. सिवन यांनी दिली. “सध्या सरकारकडून या मोहिमेसाठी 10 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या मोहिमेसाठी पीएसएलव्ही रॉकेटच्या माध्यमातून दोन उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहेत. अवकाशात सोडल्यानंतर या उपग्रहांची गती कमी करून त्यांना एकमेकांशी जोडलं जाणार आहे. जर त्यांची गती योग्यरित्या कमी झाली नाही तर ते उपग्रह एकमेकांवर आदळूदेखील शकतात आणि हाच या मोहिमेतील सर्वात कठिण भाग असल्याचंही” ते म्हणाले.

डॉकिंगमुळे शास्त्रज्ञांना आपल्या स्पेस स्टेशनमधील इंधन, अंतराळवीर आणि अन्य आवश्यक वस्तू पोहोचवू शकतो किंवा नाही यांची माहिती मिळेल. यापूर्वी स्पेडेक्स मोहिमेला 2025 पर्यंत अंतराळात सोडण्याचा मानस होता. यामध्ये रोबोटिक आर्म एक्सपेरिमेंटदेखील सामिल करण्यात येणार आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पाच देशांच्या अंतराळ संशोधन संस्थांनी मिळून तयार केलं आहे. अमेरिका, रशिया, जपान, युरोप आणि कॅनडाला ते उभारण्यासाठी 13 वर्षांचा कालावधी लागला होता. यासाठीदेखील डॉकिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता, असंही सिवन म्हणाले. “ही मोहिम सुरू करण्याचा अर्थ इस्रोच्या स्पेस स्टेशन मोहिमेची सुरूवात झाली असं होत नाही. गगनयान मोहिमेनंतरच डिसेंबर 2021 मध्ये स्पेस स्टेशन मोहिम हाती घेतली जाणार आहे. अंतराळात मानवाला पाठवणं आणि डॉकिंगमध्ये यश मिळाल्यानंतरच स्पेश स्टेशन मिशनची सुरूवात करणार असल्याचे” सिवन यांनी स्पष्ट केलं.

Web Title: Isro Dr K Sivan Will Start New Project Soon 


संबंधित बातम्या

Saam TV Live