तुमच्या बाळासाठी कोणतं 'बेबी प्रॉडक्ट' वापरताय?

तुमच्या बाळासाठी कोणतं 'बेबी प्रॉडक्ट' वापरताय?

प्रत्येक आई आपल्या बाळासाठी जे काही सर्वोत्तम आहे ते निवडतात. हजारो गोष्टींमधून जे सर्वोत्तम आहे तेच ती कोणतेही तडजोड न करता निवडत असते.

प्रत्येक आई आपल्या बाळासाठी जे काही सर्वोत्तम आहे ते निवडतात. हे काही कोणत्याही संशोधनाच्या आधारे सांगण्याची गरज नाही. आई आपल्या बाळासाठी त्याचा खाऊ, कपडे आणि इतर लागणाऱ्या गोष्टींची निवड अगदी पारखून करत असते. हजारो गोष्टींमधून जे सर्वोत्तम आहे तेच ती कोणतेही तडजोड न करता निवडत असते. जर आपण 10 आयांना त्यांच्या बाळासाठी काही निवडायला सांगितल्यास त्या दहाही आया आपल्या बाळांसाठी सर्वोत्तमच निवडतात. 


बाळ आणि आईच्या विश्वात, आई जेव्हा बाळासाठी कोणतेही 'बेबी प्रॉडक्ट' निवडते त्यावेळी सर्वप्रथम बाळाच्या नाजूक त्वचेसाठी तयार केलेले 'माईल्ड' आणि 'जेंटल' उत्पादनांची निवड करण्यावर तिचा अधिक भर असतो. बाजारात खूप मोठ्या प्रमाणावर विविध 'बेबी प्रॉडक्ट' उपलब्ध आहेत. पण बाळासाठी वापरल्या जाणाऱ्या 'बेबी प्रॉडक्ट'मध्ये हानीकारक घटक नाहीत आणि सौम्यच नाही तर वैद्यकीयदृष्ट्या ते सुरक्षित अशा उत्पादनांची निवड कशी केली जाते?

बाळासाठी प्रॉडक्ट निवडण्यासाठी कोणत्याही 'रॉकेट सायन्स'ची आवश्यकता नसते. कारण आई ही फक्त आई असते. बाळासाठी वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांमध्ये कोणते घटक वापरले असतात याबद्दल फक्त जागरूकता असणे आवश्यक आहे. त्यामुळे बाळासाठी काय योग्य आहे आणि कोणते घटक बाळासाठी वापरू नये याची माहिती असणे आवश्यक आहे. 

चला तर मग 'बेबी प्रॉडक्ट'मध्ये काय घटक वापरले असतात? आणि बाळाच्या उत्पादनांमध्ये असलेले घटक तपासणे का महत्वाचे आहे? हे जाऊन घेऊया. 

खरे सांगायचे तर ही खूप सोपी गोष्ट आहे. विशिष्ट उत्पादन तयार करण्यासाठी काही घटक आणि पदार्थ एकत्र करून ते 'बेबी प्रॉडक्ट' तयार केले जाते. त्यामुळे जेव्हा केव्हा तुमची तुमच्या बाळासाठी 'बेबी प्रॉडक्ट' खरेदी कराल त्यावेळी त्यातील घटकद्रव्य बघून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जेणेकरून आपल्याला माहिती होईल की 'बेबी प्रॉडक्ट' तयार करण्यासाठी काय वापरले आहे? शिवाय आपण योग्य 'बेबी प्रॉडक्ट'ची निवड करत आहोत अथवा नाही हे आपणास माहिती असणे आवश्यक आहे. 

नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार,10 पैकी फक्त एका आईला बाळासाठी वापरात असलेल्या 'बेबी प्रॉडक्ट'मध्ये काय वापरले आहे आणि प्रॉडक्टमधील त्या घटकाचे काय महत्त्व आहे हे माहिती असते. 

तर मग आता आयांनी काय करायला पाहिजे? बाळाच्या नाजूक त्वचेसाठी उत्कृष्ट उत्पादने कशी निवडायची?
-  'जागरूकता' याबाबतीत सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. 'बेबी प्रॉडक्ट'मध्ये वापरण्यात येणाऱ्या घटकांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. शिवाय ब्रँडची पारदर्शकता महत्त्वाची आहे. प्रत्येक ब्रँडने त्यांच्या उत्पादनांमध्ये वापरल्या जाणार्‍या घटकांची संपूर्ण यादी उपलब्ध करुन दिली पाहिजे. मात्र बाजारात  असे बरेच उत्पादक आहे की जे उत्पादनामध्ये वापरलेल्या घटकांची माहिती देत नाहीत. त्यातील काही थोडेच ब्रँड संपूर्ण माहिती पारदर्शकपणे सर्वांसमक्ष ठेवत असतात.  उदा. Johnson's Baby च्या बाळासंबंधित उत्पादनांमध्ये बाळाच्या आरोग्यासाठी आवश्यक आणि सुरक्षित घटक वापरले आहेत. शिवाय वापरलेल्या घटकांची संपूर्ण यादी देखील प्रत्येक उत्पादनावर दिलेली असते. याव्यतिरिक्त, त्यांची सर्व उत्पादने 5 स्तरीय कठोर अशा सुरक्षा प्रक्रियेतून पार पाडतात. जी त्यांच्या उत्पादनांची सुरक्षा आणि गुणवत्ता सुनिश्चित करतात. बर्‍याचदा तर स्थानिक नियामक संस्थांकडून उत्पादनांवर विचारलेल्या गोष्टीपेक्षा अधिक माहिती दिली असते. 

'बेबी प्रॉडक्ट'ची तपासणी करताना काय बघणे आवश्यक ते आपल्याला माहिती हवे. त्यासाठी पुढील मुद्दे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. 
-उत्पादनांमध्ये कमी साहित्य असणे आवश्यक आहे आणि 'पॅकेजिंग' पारदर्शक असले पाहिजे. उदा. Johnson’s baby सारख्या कंपनीची सर्व उत्पादने ही  पूर्णपणे पारदर्शक बाटल्यांमध्ये मिळतात. शिवाय सर्व उत्पादनांच्या लेबल त्यातील सर्व घटकांची संपूर्ण माहिती दिली असते. 

तुम्ही बाळासाठी वापरात असलेल्या प्रत्येक उत्पादनात नक्की काय आहे हे आपल्याला माहित असलेच पाहिजे. जे आपण उत्पादनावर दिलेल्या लेबलद्वारे घटकांची संपूर्ण यादी तपासून बघू शकतो. 

पहिली आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपल्या बाळाच्या उत्पादनांमध्ये कोणतीही हानिकारक रसायने नाहीत हे तपासून बघा
- बाळासाठी कोणतेही 'बेबी प्रॉडक्ट' खरेदी करण्याआधी बाळाच्या त्वचेवर परिणाम करणारे हानिकारक रसायने त्यात नाहीत ना याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. त्याऐवजी बाळासाठी Johnson's Babyसारख्या वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध केलेल्या उत्पादनांची निवड केली पाहिजे. ज्याची जागतिक पातळीवर 5.5 लाख लोकांवर चाचणी घेण्यात आली आहे आणि वैद्यकीयदृष्ट्या (क्लिनिकली प्रूव्ह) ते सौम्य असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यांची उत्पादने पॅराबिन फ्री, तसेच फाथलेट्स, फॉर्मल्डिहाइड, एस्बेस्टोस आणि सल्फेट्स फ्री आहेत. बाळाच्या त्वचेला अपायकारक असलेल्या कोणत्याही घटकांचा समावेश केलेला नाही. 

Johnson's Baby उत्पादनामध्ये असलेल्या घटकांवर 12 महिने चाचणी केली जाते. त्यांनतर Johnson's Baby ची खास उत्पादने 100 टक्के सुरक्षित (सेफ), शुद्ध (प्युअर) आणि सौम्य (जेंटल) असल्याचे निश्चित केले आहे. 

उत्पादनांमध्ये काही 'प्रिझर्वेटिव्ह' आणि सुगंध वापरले असतात. मात्र उत्पादनांमध्ये ते आवश्यक असतात का? ते जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.
- 'बेबी प्रॉडक्ट'मध्ये 'प्रिझर्वेटिव्ह' आणि सुगंध वापरले जातात पण त्यामुळे काळजी करण्याचे काहीच कारण नाही. Johnson's Baby किंवा त्यासारख्या इतर ब्रँडमध्ये पर्यावरणातील सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या संसर्गापासून होणारे नुकसान रोखण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह वापर केला जातो. त्याचप्रमाणे त्यातील सुगंध हा बाळांच्या संवेदनाक्षम विकासास मदत करतो. आयएफआरएच्या मानकानुसार याचा सुवास देखील सौम्य ठेवण्यात आला आहे. ज्यमुळे बाळाला त्रास होत नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बाळाचा लहानपणी येणारा त्या विशिष्ट सुवासामुळे आई-बाबा, आजी-आजोबा सगळ्यांना बाळाला उचलून घ्यावेसे वाटते. बाळाच्या आंघोळीमुळे फक्त त्वचा स्वछ होत नाही तर बाळाचे आई-बाबा आणि बाळ यांच्यादरम्यानची जवळीक अधिक  घट्ट होते.

बाळाची त्वचा सर्वाधिक संवेदनशील असते. शिवाय बदलत्या वातावरणाचा बाळाच्या नाजूक त्वचेवर लगेच परिणाम होतो. लहान बाळांची त्‍वचा मोठ्यांच्‍या तुलनेत 3 पटींनी अधिक सेंसीटिव्‍ह असते. ती एखाद्या फुलाप्रमाणे असते. यामुळे बाळाच्या त्वचेची काळजी घेताना स्किनची देखभाल करताना अनेक गोष्‍टींची काळजी घ्‍यावी लागते. विशेष करून प्रॉडक्‍ट्सची निवड करताना तर अधिकच जागरूक असणे आवश्यक आहे. 

बाळासाठी आवश्यक असलेल्या गोष्टीच बाळाला मिळत आहे ना याकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. बाळासाठी जे काही वापराल ते वैद्यकीयदृष्ट्या योग्य आणि  'ऍलर्जी फ्री' आणि प्रमाणित वापरासाठी सुरक्षित आहे याची खात्री करून घेतली पाहिजे. तुम्ही तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी थोडी देखील तडजोड करू शकत नाही, बरोबर ना! Johnson's Baby सारखा ब्रँड आपल्या गरजा समजतात आणि आपल्या बाळासाठी फक्त सुरक्षित आणि सौम्य उत्पादने उपलब्ध करून देतात. 

बाळासाठी 'बेबी प्रॉडक्ट' निवडताना शहाणपणाने निवडा. यापुढे कोणतेही नवीन प्रॉडक्ट खरेदी करताना  'बेबी प्रॉडक्ट'मध्ये असलेल्या घटकांची माहिती घ्या आणि त्यातूनच योग्य जे आहे ते 

तुमच्या बाळासोबतच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!

Web Title: ISRO still searching for India's Chandrayaan-2 Vikram moon lander

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com