नागरीकांना रोजगार देण्यापेक्षा आधी कोरोनाशी लढणे महत्त्वाचा..नवाब मलिक

अभिजीत घोरमारे
सोमवार, 3 मे 2021

गोंदिया जिल्ह्यात अद्यापही रोजगार हमीची कामे सुरू झालेली नाहीत. लॉक डाउनमुळे बेरोजगारीचे संकट मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेकांचे रोजगार बंद पडल्याने लहान व्यवसायिकांवर उपवास मारीची वेळ आली आहे

गोंदिया : गोंदिया Gondia जिल्ह्यात अद्यापही रोजगार हमीची कामे सुरू झालेली नाहीत. लॉकडाउनमुळे Lockdown बेरोजगारीचे Unemployed संकट मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेकांचे रोजगार बंद पडल्याने लहान व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाउन असल्याने हे बेरोजगारीचे संकट आजून किती दिवस असणार आहे याची चिंता नागरिकांना लागली आहे. It is important to fight the corona before employing civilians

परंतु, हातावर पोट असलेल्या नागरिकांनी कस जगायचं असा मोठा प्रश्न देखील गोंदिया मधील नागरिकांना पडला आहे. लॉकडाऊन लागल्याने हातावर पोट असणाऱ्या नागरीकांचे हाल होत आहेत. असं असताना देखील गोंदिया जिल्ह्याकडे कोणी पाहत नसल्याने तेथील नागरिक हैराण झाले आहेत. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक Nawab Malik यांनी नागरीकांना रोजगार हमीची कामे देण्यापेक्षा कोरोनातुन नागरीकांचे जीव वाचविणे हे महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.

पालकमंत्री नवाब मलिक यांच्या व्यक्तव्यावरून गोंदिया मधील नागरिकांनी नव्या वादाला तोंड फोडल आहे. मग रोजगार हमीची कामेच सरकार Government देत नसेल, तर बेरोजगारी भत्ता तरी सरकारने द्यावा, अशी मागणी गोंदियामधील नागरिकांनी आता जोर धरू लावली आहे. नवाब मलिक यांचे बेताल वक्तव्य आता त्यांच्याच तोंडशी पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Edited By- Digambar jadhav

 

संबंधित बातम्या

Saam TV Live