देशात पुन्हा लॉकडाऊनची तयारी? मुंबईत शाळा बंदच, तर याठिकाणी संचारबंदी

साम टीव्ही
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

त्यामुळे महाराष्ट्रातीह लॉकडाऊनची शक्यता नाकारता येत नाही. सध्या जरी रुग्णसंख्या कमी होत असली तरी इतर राज्यातून ही लाट महाराष्ट्रात यायला वेळ लागणार नाही त्यामुळे सर्वांनी सतर्क राहून नियमांचं पालन करणं अत्यावश्यक आहे. 

देशासह राज्यात आता हळूहळू सर्व गोष्टी सुरु झाल्या आहेत, दरम्यान, देशभरात अनलॉकचे नियम पाळून सर्व गोष्टी सुरु करण्यात आल्यात. यामध्ये आता महाराष्ट्रातही मंदिरं सुरु करण्यात आली. तर शाळा सुरु करण्याचा निर्णयही घेण्यात आलाय.

यामध्ये 23 नोव्हेंबरपासून 9वी ते 12वीचे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. मात्र आता मुंबई प्रशासनाकडून शाळा सुरु करण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही, तरी मुंबईचे आयुक्त इकबाल चहल यांनी तसे आदेश दिलेत. तर शाळा सुरु करण्याचा निर्णय हा सर्वतोपरी स्थानिक प्रशासनाचा असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांनी सांगितलंय. यामध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय गुजरातनेही पुढे ढकलला आहे. हिमाचल प्रदेश, मिझोरम, हरियाणा, उत्तराखंड आणि हरियाणा येथील शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत. केंद्राची सूट असूनही महाराष्ट्र सरकारने 30 नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढविला होता. म्हणजेच उर्वरित राज्यांइतके अनलॉक नसलं झालं तरी राज्यात आवश्यक आणि सामान्य कामांसाठी सूट आहे.

दरम्यान, लॉकडाऊन पुन्हा होईल का? हा प्रश्न लोकांच्या मनात पडला आहे, कारण गेल्या काही दिवसांत अशीच चिन्हं दिसू लागली आहेत. कोविड -19 च्या नव्या रुग्णांमध्ये घट होत असली तरी अद्यापही काही ठिकाणी परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. नोव्हेंबर महिन्यात रुग्ण घटण्याऐवजी वाढतच चालली आहे. अशा परिस्थितीत काटेकोरपणे नियमांचे पालन होणं आवश्यक झालं आहे.

तर शुक्रवारी रात्री ते सोमवार सकाळपर्यंत गुजरातच्या अहमदाबादमध्ये 'फुल कर्फ्यू' लागू करण्यात आला आहे. दिल्ली सरकारनेही कडक अंमलबजावणी सुरु केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातीह लॉकडाऊनची शक्यता नाकारता येत नाही. सध्या जरी रुग्णसंख्या कमी होत असली तरी इतर राज्यातून ही लाट महाराष्ट्रात यायला वेळ लागणार नाही त्यामुळे सर्वांनी सतर्क राहून नियमांचं पालन करणं अत्यावश्यक आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live